सध्या IPL 2022 ची धामधूम सुरू आहे. या स्पर्धेत विविध संघाचे क्रिकेटपटू चर्चेत असतात. पण त्यासोबतच सध्या पॉर्नस्टार केंड्रा लस्ट (Kendra Lust) हिचीही जोरदार चर्चा रंगली आहे.
भारतात आणि त्यातही मुंबईत सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेचा आणि विदेशी पॉर्नस्टारचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊया त्यामागचं कारण.
केंड्रा लस्टने काही दिवसांपूर्वी IPL सामन्या दरम्यान ट्वीट केलं. त्या ट्वीटमध्ये तिने भारताच्या स्टार क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक केलं.
केंड्राने कौतुक केलेला खेळाडू म्हणजे, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. गुजरात टायटन्सचा गोलंदाज म्हणून पहिला सामना खेळताना मोहम्मद शमीने दमदार कामगिरी केली. त्यामुळे तिने त्याचं कौतुक केलं.
गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर केंड्रा लस्टने मोहम्मद शमीचं कौतुक केलं. मोहम्मद शमीचा परफॉरमन्स खूपच भारी होता, असं ट्वीट तिने केलं.
केंड्रा लस्टने यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठीही एक ट्विट केलं होतं. Virat Kohli च्या संघाला तिने पाठिंबा दिला होता.
केंड्रा लस्ट ही ४३ वर्षांची असून ती एक अमेरिकन पॉर्नस्टार आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.
Instagram वर केंड्रा लस्टचे सुमारे ७.८० लाख फॉलोअर्स आहेत. तसेच, ट्विटरवर देखील तिला दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
देशविदेशातील मोठमोठे स्टार्स आणि सेलिब्रिटी हे IPLचे चाहते आहेत. IPL बद्दल एखाद्या सेलिब्रिटीने ट्वीट केलं तर त्याची नक्कीच चर्चा होते. त्यामुळेच Adult Star केंड्रा लस्टच्या ट्वीटची जोरदार चर्चा रंगली आहे.