लहानपणीच झाली शारिरीक शोषणाची शिकार; जाणून घ्या Shikhar Dhawan च्या एक्स पत्नीचा प्रवास

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर घवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी विभक्त झाल्याची (Divorce) माहिती समोर आली आहे. याची माहिती खुद्द आयशा मुखर्जीनं एक भावूक पोस्ट लिहीत दिली आहे. २०१२ मध्ये शिखर धवन आणि आयशा यांचा विवाह झाला होता. २०१४ मध्ये दोघांना पुत्ररत्नही झालं होतं. परंतु विवाहाच्या तब्बल ९ वर्षांनंतर त्यांच्या या निर्णयानं सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

27 ऑगस्ट 1975 साली भारतात जन्मलेल्या आयशाकडे दुहेरी नागरिकत्व आहे. तिचे वडील बंगाली तर आई ब्रिटीश होती. बंगालमध्ये एकत्र काम करताना त्यांचं प्रेम जुळलं आणि त्यांनी लग्न केलं. आयशाच्या जन्मानंतर ते ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले.

आयशा प्रोफेशनल किक बॉक्सर आहे आणि त्यामुळे तिला फिटनेसचं महत्त्व खूप माहिती आहे. आयशामुळे शिखर धवनलाही आपलाय फिटनेस राखण्यात मदत मिळायची. धवन आयशापेक्षा 10 वर्ष लहान आहे. आयशाने आधी ऑस्ट्रेलियन बिझनसमनशी लग्न केलं होतं. त्या दोघांच्याही दोन मुली आहेत. त्याच्याशी नातं तुटल्यानंतर आयशा फेसबुकच्या माध्यमातून शिखर धवनच्या संपर्कात आली. दोघंही एकमेकांवर प्रेम करू लागले आणि त्यांनी लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगाही आहे, ज्याचं नाव जोरावर. धवनने आयशाच्या दोन मुलींनाही आपलं नाव दिलं.

आयशा नेहमी स्पोर्ट्स लूकमध्ये दिसते. लहानपणापासूनच तिला खेळाची आवड आहे. एका मुलाखतीत तिनं खुलासा केला होता की लहानपणी ती शारीरिक शोषणाचा शिकार झाली होती. तिच्यासाठी ती भीतीदायक अशी आठवण आहे. मात्र इतर मुलींप्रमाणे ती विसरण्याऐवजी आयशाने स्वत:ला मजबूत बनवण्याचं ठरवलं आणि खेळाच्या मैदानात उतरली. आयशा क्रिकेट फुटबॉल खेळली. मात्र किक बॉक्सिंगमध्ये अनेक किताब जिंकल्यानंतर तिनं यालाच आपलं प्रोफेशन म्हणून निवडलं.

दरम्यान, "एकदा घटस्फोट झाल्यावर असं वाटलं की दुसऱ्यांदा बरंच काही धोक्यात आलं होतं, मला बरंच काही सिद्ध करायचं होतं. म्हणून जेव्हा माझं दुसरं लग्न मोडलं तेव्हा ते खूप भीतीदायक होतं. घटस्फोट हा वाईट शब्द असल्याचं मला वाटलं. दोनदा माझा घटस्फोट झाला. शब्दांचे अर्थ आणि त्यांचे संबंध कसे असू शकतात हे अतिशय मजेशीर आहे. मी पहिल्यांदा जेव्हा घटस्फोट घेतला तेव्हा खूप भीती वाटली होती. त्यावेळी अयशस्वी ठरल्याची भावना मनात आली आणि खुप काही चुकीचं करतेय असं वाटत होतं," असं आयशानं म्हटलं आहे.

मी सर्वांना निराश केलं असं मला वाटलं, स्वार्थी वाटलं आणि माझ्या पालकांना निराश केलं. माझ्या मुलांचा मी अपमान करत आहे अशी भावना मनात आली आणि काही प्रमाणात मला मी देवाचाही अपमान केला असल्याचंही वाटलं. घटस्फोट हा अतिशय वाईट शब्द होता," असंही तिनं आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहीलं आहे.

शिखर धवननं सध्या याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. अथवा त्याच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. यापूर्वी शिखर धवन आणि आयशा यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचं वृत्त समोर आलं होतं. इतकंच नाही, तर आयशानं शिखर धवनचे सर्व फोटो आपल्या फीडमधून डिलीट केले होते.

Read in English