Join us

"हा सागरी किनारा..." पांड्याच्या आयुष्यातील खास दिवस; नवी गर्लफ्रेंड अन् सेलिब्रेशन मूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:35 IST

Open in App
1 / 7

हार्दिक पांड्यानं गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत सूत जुळल्याची गोष्ट कबुल केल्यावर आता आणखी काही पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.

2 / 7

हार्दिक पांड्यानं नुकताच आपला ३२ वा वाढदिवस साजरा केला. सागरी किनारा अन् सोबत नव्या गर्लफ्रेंडची साथ अशा मूडमध्ये पांड्याने आपला बर्थडे साजरा केला. इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून त्याने खास फोटो शेअर केले आहेत.

3 / 7

हार्दिक पांड्यानं जे फोटो शेअर केल्यात त्यात पहिल्या पहिल्या स्लाइडमध्ये चॉकलेट केक दिसतो. ज्यावर हॅप्पी बर्थडे असे लिहिले आहे.

4 / 7

हार्दिक पांड्यानं बर्थडे दिवशी मिळालेल्या खास सरप्राइजची झलकही फोटोच्या माध्यमातून दाखवून दिलीये. फोटोत दिसणारे हे हँडमेड कार्ड बहुतेक त्याला गर्लफ्रेंडनं दिल्याचे दिसते.

5 / 7

सागरी किनारा अन् माहिकासोबतचा रोमँटिंक वॉक हा देखील पांड्याच्या बर्थ डे सेलिब्रेशमधील एक खास क्षण राहिला.

6 / 7

बर्थ डे बॉय हार्दिक पांड्याचा रुबाब हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. निसर्गरम्य वातावरणातील त्याचा समुद्र किनाऱ्यावरील लूकही एकदम कडक आहे.

7 / 7

माहिका शर्मानंही आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून एक सोलो फोटो शेअर केला आहे. लवकरच तिच्या स्टोरीत पांड्यासोबतची फ्रेम दिसेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्याऑफ द फिल्ड