Hardik Pandya:हार्दिक पांड्या त्याच्या लॅव्हिश लाइफस्टाइलमुळे नेहमी चर्चेत असतो. हार्दिक पांड्याचे घर गुजरातमधील वडोदरा येथील दिवालीपुरा या पॉश भागात आहे. 6,000 चौरस फुटांमध्ये पसरलेला हा चार बेडरूमचा फ्लॅट खूपच आलिशान आहे. दोन्ही भावांची इच्छा होती की डिझायनरने प्रत्येक खोलीचे नियोजन अशा प्रकारे करावे की त्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समोर येईल.
हार्दिक पांड्याच्या घरात प्रवेश केल्यावर तुम्हाला एक मोठा हॉल दिसेल. ही सुंदर लिव्हिंग रूम फ्लॅटमधील सर्वात आकर्षणाची जागा आहे. हार्दिक अनेकदा या मोठ्या हॉलमध्ये मोठ्या भावासोबत क्रिकेट खेळताना दिसतो.
फ्लॅटमध्ये सर्व सुविधांनी युक्त जिमही आहे, जिथे दोघे भाऊ व्यायाम करतात. हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर अनेकदा जिम करतानाचा फोटो शेअर केले आहेत.
हार्दिकला त्याची खोली 'ब्लीड ब्लू' करायची होती, म्हणून डिझायनर्सनी त्याच्या रूममध्ये निळ्या रंगाच्या काही छटा वापरल्या आहेत. हार्दिकच्या खोलीत, त्याच्या पलंगाच्या मागे भिंतीवर एक फ्रेम केलेले चित्र आहे, ज्यामध्ये हार्दिक इतर भारतीय क्रिकेटपटूंसोबत दिसू शकतो.
दुसरीकडे, कृणालची खोली केशरी आणि पिवळ्या रंगांनी रंगवलेली आहे. खोलीच्या आत पलंग आणि पलंगाच्या समोर एक टीव्ही सेटदेखील आहे. भिंतींवर पांड्या ब्रदर्सची काही फोटोज आहेत. यातून दोघे एकमेकांच्या किती जवळ आहेत, हे दिसते.
हार्दिक-कृणालच्या वडोदरा फ्लॅटमधील जेवणाची जागाही खूप मोठी आणि आकर्षक आहे. डायनिंग रूमच्या भिंतींवर डिझाईन्स आणि आकर्षक पेंटिंग्ज तयार केल्या आहेत. यासोबतच त्याच्या छतावर एक सुंदर झुंबरही लटकले आहे.
हार्दिक पांड्याच्या घरात एक मोठी बाल्कनीदेखील आहे, जिथे कुटुंबातील सदस्य त्यांच्या मोकळ्या वेळेचा आनंद घेतात. या बाल्कनीमध्ये सूर्यप्रकाशही चांगल्या प्रकारे येतो. दोन्ही भाऊ बाल्कनीत बोर्ड गेम खेळतानाही दिसले आहेत.
पांड्या ब्रदर्सने मुंबईच्या वांद्रेमध्येही एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. 3838 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या फ्लॅटची किंमत सुमारे 30 कोटी रुपये आहे. या फ्लॅटमध्ये एकूण 8 बेडरूम आहेत. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटनीदेखील ज्या सोसायटीत राहतात.
इतकंच नाही तर हार्दिक-कृणालच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये एक खाजगी थिएटरही आहे, जिथे म्युझिक सिस्टीमसह चित्रपट पाहण्यासाठी मोठा स्क्रीन आहे. यामुळेच हार्दिक-कृणालच्या मुंबईतील घराची किंमत इतकी आहे.