व्हॅलेंटाईन डे ला ख्रिश्चन पद्धतीने विवाह केल्यानंतर हार्दिक पांड्याने गुरुवारी रात्री त्याच्या आणि नाताशा स्टँकोव्हिच यांच्या हिंदू पद्धतीने झालेल्या विवाहाचे फोटो पोस्ट केले.
राजस्थानातील उदयपूर येथे १४ फेब्रुवारी २०२३ मध्ये हा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. २०२०मध्ये कोरोना काळात हार्दिक-नताशा यांना घरच्या घरीच लग्न करावं लागलं होतं.
त्यामुळेच या कपलने तीन वर्षांनंतर पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. एकदम राजेशाही लग्न पार पडले. सुरुवातीला हार्दिक-नताशा यांच्या ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नाचेच फोटो व्हायरल झाले होते.
बुधवारी हार्दिकने सर्वांना सप्राईज दिले. त्याने हिंदू पद्धतीने झालेल्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आणि त्यात दोघंही अतिशय सुंदर दिसत आहेत.
हार्दिक पांड्याने शेरवानी घातली आहे आणि त्यावर दुपट्टा दिसतोय. नताशानेही गोल्डन रंगाचा लेहेंगा परिधान केलेला पाहायला मिळतोय.
एका फोटोत हार्दिक व नताशा एकमेकांच्या हातात हात घेऊन उभे आहेत आणि त्यांच्यावर हजारो फुलांचा वर्षाव झालेला पाहायला मिळतोय.
१ जानेवारी २०२०मध्ये हार्दिकने दुबईत नताशाला प्रपोज केले होते आणि त्यानंतर कोरोना काळात लग्न केले. जुलै २०२०मध्ये त्यांना पुत्रप्राप्ती झाली. अगस्त्या असे त्याचे नाव आहे.