भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी कर्णधार पृत्वी शॉ यापूर्वीही दुसऱ्या मुलीसोबत प्रेमप्रकरणाच्या चर्चेत आला होता. २३ वर्षीय पृथ्वी जुलै २०२१मध्ये भारताकडून अखेरचा सामना खेळला.
नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याचा संघात समावेश केला होता होता, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.
Valentine’s Day ला पृथ्वी शॉ याने इस्टाग्राम स्टेरीवर एक पोस्ट लिहिली त्यात त्याने हॅप्पी व्हॅलेटाईन बायको ( 'Happy valentines my wifey' ) असे लिहिले. पृथ्वी शॉने पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये तो आणि एक मुलगी एकमेकांना Kiss करण्यासाठी जवळ येत असल्याचे दिसत आहेत.
पृथ्वी शॉ याने कथित गर्लफ्रेंड निधी तपाडिया ( Nidhi Tapadia) हिला टॅग केले. निधीनेही इस्टा स्टोरी लिहिली आणि तिने स्वतःवर आधी प्रेम करा असा सल्ला दिला. ही दोघं नुकतीच काश्मीरमध्ये फिरायलाही गेली होती आणि दोघांच्या इस्टा स्टोरीवरून चाहत्यांना याची माहिती मिळाली.
पृथ्वीच्या या स्टोरीमुळे त्याने गुपचूप लग्न केलं की काय अशी चर्चा सुरू झाली. पण, पृथ्वीने काही वेळातच ही स्टोरी डिलीट केली. त्यानंतर कुणीतरी खोडसाळ पणा केल्याची पोस्ट त्याने टाकली.
निधी तपाडिया एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. निधी तपाडियाचे इन्स्टाग्रामवर १ लाख ८ हजार फॉलोअर्स आहेत.
निधी मुळची महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील आहे. पृथ्वी शॉ नववर्षाची पार्टी करण्यासाठी एका पबमध्ये गेला असताना निधी त्याच्यासोबत दिसली होती. दोघांचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
पृथ्वी शॉ याआधी अभिनेत्री प्राची सिंह हिला डेट करत होता. २०२० मध्ये त्यांच्या अफेअरच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप होऊन त्या दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं होतं.