भारतीय संघाचा माजी गोलंदाज झहीर खानचा आज वाढदिवस. 2003, 2007 आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा मान झहीरने पटकावला होता.
7 ऑक्टोबर 1978मध्ये झहीरचा जन्म झाला. पण, झहीरला क्रिकेटपटू नाही तर इंजिनियर बनायचे होते. त्यानं बीटेक मध्ये अॅडमिशनही घेतली होते. पण, क्रिकेटप्रती त्याची आवड पाहता वडिलांनी त्याला गोलंदाज बनण्याचा सल्ला दिला.
झहीरने 92 कसोटीतं 311, 200 वन डेत 282 आणि 17 ट्वेंटी-20त 17 विकेट्स घेतल्या आहेत.
क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या झहीरची लव्ह लाईफ एखाद्या बॉलीवूड चित्रपटासारखी आहे. झहीरवर अनेक मुलींचे क्रश होते, पण या गोलंदाजाचं हृदय बॉलिवूडमधील एका नायिकेनं पळवलं होतं.
पण, झहीरनं त्याच्या प्रेमाची कधीच सार्वजनिक चर्चा केली नाही. सागरिका घाटगेशी झहीरनं लग्न केला, परंतु त्यांच्या लग्नाला मान्यता एका CDमुळे मिळाली.
झहीर आणि सागरिकाने ज्यावेळी लग्न करण्याच निर्णय घेतला, त्यावेळी ही गोष्ट झहीरच्या घरात सांगितली. त्यावर सागरिकाचा चक दे इंडिया हा चित्रपट आम्हाला पहिल्यांदा पाहायचा आहे आणि त्यानंतरच आम्ही तुमच्या लग्नाच्या बाबतीत निर्णय घेऊ असे घरातल्यांनी सांगितले.
त्यावर झहीरने लगेचच चक दे इंडिया या चित्रपटाची सीडी आणून दिली आणि हा चित्रपट सगळ्यांना दाखवला. हा चित्रपट पाहिल्यानंतरच माझ्या घरातल्यांनी सागरिका आणि झहीरच्या लग्नाला परवानगी दिली.