Join us  

Happy Birthday Virat: रात्री 12 वाजता ड्रेसिंग रुममध्ये बर्थ डेचं सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 10:32 AM

Open in App
1 / 6

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा आज 5 नोव्हेंबरला 29 वा वाढदिवस आहे.

2 / 6

दुस-या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यामुळे विराट कोहलीच्या 29 व्या वाढदिवसाच्या आनंदावर नक्कीच विरजण पडलंय. पण पराभव विसरून 4 नोव्हेंबरला टीम न्यूझीलंडविरूद्धचा सामना झाल्यावर ठीक रात्री 12 वाजता टीमने ड्रेसिंग रुममध्ये केक कापून विराटचा वाढदिवस साजरा केला.

3 / 6

हा वाढदिवस संस्मरणीय करण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडूनही विशेष आयोजन करण्यात आले होते.

4 / 6

विराट कोहली हा क्रिकेटमधील प्रत्येक विक्रमाला गवसणी घालणारा फलंदाज आहे. सर्वाधिक शतकं, सर्वाधिक वेगवान धावा, स्पोर्ट्स ब्रँड, यशस्वी कर्णधार आणि कमी वयात एवढी उंची गाठणारा ता जगातील एकमेव फलंदाज असावा.

5 / 6

विराटला केक लावून झाल्यानंतर हार्दिक पांड्याने कोहलीसोबतचा फोटो ट्विट केला आणि बदला नंबर 1...वाढदिवसाच्या शुभेच्छा कॅप्टन कोहली असं ट्विट केलं.

6 / 6

विराटने केक कापून झाल्यानंतर हार्दिकने त्याचा बदला घेतला. त्याने विराटच्या चेह-याला केक लावून अक्षरशः त्याला भूत बनवलं. 17 ऑक्टोबरला पांड्याचा वाढदिवस होता. तेव्हा पांड्याच्या चेह-यावर पूर्णपणे केक लावण्यात आला होता. त्यावेळी, वर्षात प्रत्येकाचा वाढदिवस येतो...बदला घेतला जाईल असं पांड्या म्हणाला होता.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघक्रिकेट