Happy Birthday Shubman Gill : टीम इंडियातील प्रिन्ससाठी BCCI सह MI नं शेअर केला खास मेसेज

शुबमन गिलवर शुभेच्छांचा वर्षाव

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल नव्या जबाबदारीसह सध्या आशिया कप स्पर्धेच्या तयारीत आहे. BCCI नं यूएईच्या मैदानातील आशिया कप स्पर्धेसाठी पुन्हा एकदा त्याच्याकडे टी-२० संघाचे उप कर्णधारपद सोपवले आहे.

वर्षभरानंतर भारतीय टी-२० संघाकडून मैदानात उतरण्याआधी BCCI सह आयपीएलमधील MI फ्रँचायझी संघानं भारतीय कसोटी संघाच्या कर्णधाराला २६ व्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

BCCI नं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील त्याच्या कामगिरीची आकडेवारी शेअर करत शुबमन गिलला बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी चॅम्पियन असल्याचा खास उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

शुबमन गिल हा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करतो. पण टीम इंडियाचा स्टार असल्यामुळे बर्थडेच्या दिवशी त्याच्यावर आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जसह अन्य फ्रँचायझी संघांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे दिसून येते.

शुबमन गिलनं भारतीय क्रिकेट क्रिकेट संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खास छाप सोडलीये. इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून त्याने कॅप्टन्सीच्या नव्या इनिंगला सुरुवात केली होती.

आशिया कप स्पर्धेत उप कर्णधारपदाची जबाबदारी आल्यावर भविष्यात या फॉरमॅटसह वनडेतही तोच भारतीय संघाचा कर्णधार दिसेल, अशी चर्चा रंगत आहे.

शुबमन गिलनं आतापर्यंत आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११३ सामने खेळले असून त्याने ६००० धावांचा पल्ला गाठला आहे. यात १८ शतकांचा समावेश आहे.

युवा क्रिकेटरनं अल्पावधित क्रिकेटच्या मैदानात आपली खास छाप सोडलीये. त्याच्या या यशात वडिलांचा मोठा वाटा आहे. लखविंदर गिल यांनी लेकाला क्रिकेटर बवण्यासाठी शेतात खेळपट्टी तयार करून त्याला घडवले. गिलला आउट करा अन् १० रुपये मिळवा, या खास प्लॅनसह त्यांनी शुबमन गिलला दिवसभर नेट प्रॅक्टिसची शक्कल लढवली होती. वडिलांचे कष्टाचं लेकानं चीज करून दाखवलंय.