Join us
Daily Top 2Weekly Top 5

टेनिसपटू गॅब्रिएलाला प्रपोज करण्यासाठी अर्जेंटिनामध्ये गेले होते रवी शास्त्री, बॉलिवूड अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 10:13 IST

Open in App
1 / 10

2 / 10

ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टींवर तर शास्त्रींनी धावांचा पाऊस पाडला होता. १९९१-९२साली सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०६ धावांची खेळी केली होती. त्यांनी तब्बल १० तास खेळपट्टीवर खिंड लढवली होती.

3 / 10

१९८५मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्येही शास्त्री यांचा जलवा दिसला. त्यांनी गोलंदाजी व फलंदाजीत कमाल दाखवताना सर्वोत्तम खेळाडू म्हणजेच चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा पुरस्कार जिंकला होता. त्यांना त्यासाठी ऑडी कार बक्षीस म्हणून देण्यात आली होती.

4 / 10

शास्त्रींनी ८० कसोटींत ३५.७९च्या सरासरीनं ३०३० धावा केल्या आणि १५१ विकेट्स घेतल्या. १५० वन डे सामन्यांत त्यांनी ३१०८ धावा केल्या आणि १२९ विकेट्स घेतल्या.

5 / 10

मैदानावरील कामगिरीबरोबरच बाहेरील चर्चांनीही रवी शास्त्री चर्चेत राहिले. क्रिकेट कारकीर्दित रवी शास्त्री यांचे नाव काही बॉलिवूड अभिनेत्रींसोबतही जोडले गेले.

6 / 10

टेनिसपटू गॅब्रिएला हिला प्रपोज करण्यासाठी रवी शास्त्री अर्जेंटिनाला गेल्याचीही चर्चा होती. क्रिकेटच्या मैदानावर रवी शास्त्री आणि टेनिस कोर्टवर गॅब्रिएला यांची जादू सुरू होती. शास्त्री अर्जेंटिनाला गेले होते, तेव्हा गॅब्रिएलानं कोण शास्त्री असा सवाल केला होता. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आपण अर्जेंटिनात कामानिमित्तानं गेल्याचे स्पष्टीकरण शास्त्रींनी दिले होते.

7 / 10

शास्त्रींच्या लुकवर बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंह फिदा झाली होती. अमृता आणि रवी एका मॅगझिन कव्हर पेजवर सोबत दिसले होते. त्या फोटोशूट दरम्यानच दोघ एकमेकांच्या प्रेमात पडले, असे सांगितले जाते. त्यानंतर अमृता क्रिकेट सामना पाहण्यासाठी स्टेडियमवरलाही जाऊ लागली.

8 / 10

या दोघांनी 1986मध्ये साखरपुडाही केला होता. पण, त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. या दोघांचं नातं एका मस्करीनं तुटलं होतं, असा दावा त्यावेळी केला गेला. विनोद खन्ना यांच्यासोबत नातं सुरू होणार असल्याची मस्करी अमृतानं केली होती. त्यानंतर रवी शास्त्री नाराज झाले होते. पण, या वृत्ताला दुजोरा देणारे पुरावे नाही.

9 / 10

रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की,''त्यांना कोणत्याही अभिनेत्रीशी विवाह करायचा नाही, कारण होणाऱ्या पत्नीनं कुटुंबाला प्राधान्य दिले पाहीजे, करिअरला नाही.'' अमृतानेही करिअरमुळे हे नातं पुढे टिकू शकत नाही, असं सांगितलं होतं.

10 / 10

निमरत कौर हिच्या सोबतही शास्त्री यांचं नाव जोडलं गेलं.

टॅग्स :रवी शास्त्रीअर्जेंटिनाअमृता सिंग