Join us  

Happy Birthday Rahul Dravid: 'द वॉल' @ 47

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 11:08 AM

Open in App
1 / 10

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविडचा आज 47 वा वाढदिवस आहे. 11 जानेवारी 1973 ला मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये राहुल द्रविडचा जन्म झाला होता.

2 / 10

राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. 16 वर्ष भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर मार्च 2012 मध्ये द्रविडने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

3 / 10

2005 मध्ये राहुल द्रविडला भारतीय संघाचा कर्णधार बनविण्यात आले होते. मात्र, 2007 मध्ये त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

4 / 10

सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकरनंतर राहुल द्रविड तिसरा फलंदाज आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजाराहून जास्त धावा केल्या आहेत.

5 / 10

तसेच, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा तो जगातील सहावा आणि भारतातील तिसरा खेळाडू ठरला होता.

6 / 10

राहुल द्रविड एकमेव खेळाडू आहे, ज्याने कसोटी खेळणाऱ्या सर्व 10 देशांविरोधात शतक केले आहे. तसेच, 182 झेल घेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावे आहे.

7 / 10

राहुल द्रविड पहिला भारतीय कर्णधार आहे, ज्याने दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटीमध्ये भारताला पहिला विजय मिळवून दिला होता.

8 / 10

राहुल द्रविडला खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ खेळण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे त्याला 'द वॉल' अशी उपाधी देण्यात आली होती. याशिवाय, राहुल द्रविडला अर्जुन, पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

9 / 10

2004-05 मध्ये राहुल द्रविडला सेक्‍सिएस्‍ट स्‍पोर्ट्स पर्सनॅलिटीच्या अवार्डने गौरविण्यात आले होते.

10 / 10

याचबरोबर, राहुल द्रविडने ICC Test Player of the year आणि Player of the year हा अवार्ड आपल्या नावे केला होता.

टॅग्स :राहूल द्रविड