हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस... हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मासाठी रोमँटिक पोस्ट, PHOTOS

Hardik Pandya Mahieka Sharma Romantic Hot Photos: हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड माहिकाला आपल्यासोबत वर्ल्डकप दौऱ्यावरही घेऊन आला आहे

भारतीय संघाचा धडाकेबाज अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो.

नताशा स्टँकोविचशी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या सध्या मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मा हिला डेट करत आहे.

माहिका हार्दिकसोबत अनेकवेळा एकत्र दिसली आहे. तसेच हार्दिकच्या घरातील एका धार्मिक कार्यातही ते एकत्र दिसले.

हार्दिक पांड्या आपली गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत व्हेकेशन वरही गेला होता. त्यावेळचे काही रोमँटिक फोटो त्याने पोस्ट केले होते.

आज माहिका शर्मा हिचा वाढदिवस आहे. या निमित्ताने माहिका आणि हार्दिक या दोघांना सोबत राहून वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले.

श्रीलंकेतील एका आलिशान रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमधला रोमँटिक आणि हॉट फोटो पोस्ट करत हार्दिकने लिहिले- हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस.