एखादी गोष्ट आपण सांगितल्यासारखी नसेल, तर काही वेळा लोकं 'मी अर्धी मिशी काढून फिरेन' असे म्हणतात.
एखाद्या चॅलेंजमध्ये पराभूत झाल्यावर तुम्हाला काहीही करायला भाग पाडलं जाऊ शकतं.
एखाद्यावर प्रेम व्यक्त करतानादेखील काही जणं अशा गोष्टी करतात.
दक्षिण आफ्रिकेचा माजी महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसचा सध्या एक फोटो चांगलाच वायरल झाला आहे.
एक फोटो कॅलिसने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
या फोटोमध्ये कॅलिसने अर्धी मिशी आणि दाढी काढल्याचे दिसत आहे.
कॅलिसने असे केले तरी का? हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल.
दक्षिण आफ्रिका हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. या गेंड्यांना वाचवण्यासाठी काही पैशांची गरज आहे. त्यामुळे कॅलिसने असे केल्याचे म्हटले जात आहे.
यासाठी एक चॅलेंज देण्यात आले आहे. व्यक्तीने आपली अर्धी दाढी काढून त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करावा. यामधून गेंड्याबाबत जागृती आणि फंड गोळा केले जाईल, असे म्हटले जात आहे.