Join us

घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 21:27 IST

Open in App
1 / 4

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आला आहे. चहलने या वर्षाच्या सुरुवातीला कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर चहलचे नाव आरजे महावश हिच्याशी जोडले जात आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या आहे. मात्र, याबाबत दोघांनीही प्रेमसंबंधावर भाष्य केले नाही. परंतु, अनकेदा हे दोघे एकत्र दिसले आहेत.

2 / 4

भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने २०१२ मध्ये आयेशा मुखर्जीशी लग्न केले. परंतु, २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मात्र, आता शिखर धवन अबू धाबीमधीच्या सोफी शाइनला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. या दोघांनी त्यांच्या नात्याची पुष्टी केलेली नसली तरी शिखर धवन आणि सोफी शाइन दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. अलीकडेच शिखरने इंस्टाग्रामवर सोफीसोबतचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला.

3 / 4

भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने नुकताच मॉडेल-अभिनेत्री नताशा स्तांकोविक हिच्यासोबत घटस्फोट घेतला. तेव्हापासून हार्दिक पांड्याचे काही महिलांशी नाव जोडले गेले, यात जास्मिन वालिया हिच्या नावाचा समावेश आहे. हार्दिक किंवा जास्मिन दोघांनीही एकत्र असल्याची पुष्टी केलेली नाही. पण दोघांच्या सोशल मिडिया पोस्टमुळे अफवांना खतपाणी मिळाले आहे.

4 / 4

भारतीय माजी विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिकने त्याची लहानपणीची मैत्रीण निकिता वंजारा हिच्याशी लग्न केले होते. पंरतु, वैयक्तिक कारणांवरून त्यांच्यात घटस्फोट झाला. यानंतर दिनेश कार्तिक भारतीय स्क्वॅश स्टार दीपिका पल्लीकल हिच्या प्रेमात पडला. दोघांनी २०१५ मध्ये एकमेकांशी लग्न केले. मात्र, त्याआधी त्यांच्या अफेरबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या.

टॅग्स :ऑफ द फिल्डयुजवेंद्र चहलहार्दिक पांड्यादिनेश कार्तिकशिखर धवन