एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्यावर आपला निर्णय बदलत दक्षिण आफ्रिकेचा स्टार विकेट किपर बॅटर पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे.
वनडे निवृत्तीनंतर यू-टर्न घेऊन मैदानात उतरत या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढल्याचे पाहायला मिळाले. वनडेत सर्वात जलद ७००० धावांचा पल्ला गाठणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.
क्विंटन डी कॉक याने १५८ डावात वनडेत ७००० धावांचा टप्पा गाठत या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
इथं एक नजर टाकुयात वनडेत सर्वात जलदगतीने ७००० धावांचा पल्ला गाठणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांच्या खास रेकॉर्डवर
वनडेत सर्वात जलद ७००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हाशीम आमला अव्वल स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने १५३ सामन्यातील १५० डावात हा डाव साधला होता.
केन विलियम्सन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या स्टार बॅटरनं १६७ सामन्यातील १५९ डावात हा टप्पा पार केला होता.
विराट कोहली या यादीत चौथ्या स्थानावर आहे. भारताच्या स्टार बॅटरनं १६९ सामन्यातील १६१ डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७००० धावा पूर्ण केल्या होत्या.