Join us

वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:47 IST

Open in App
1 / 5

वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार क्लाइव्ह लॉईड हे एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजयी टक्केवारी (७७.७१ %) असलेले कर्णधार आहेत. त्यांनी 1975 ते 1985 दरम्यान 84 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, त्यापैकी ६४ सामने जिंकले. त्यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने १९७५ आणि १९७९ मध्ये सलग दोन विश्वचषक जिंकले.

2 / 5

हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले रोहित शर्मा यांचा विजयाचा टक्का ७८.२७ टक्के आहे. त्याने ५६ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी ४२ सामने जिंकले आहेत. त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताला अंतिम फेरीत पोहोचवले आणि देशाला २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली.

3 / 5

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज रिकी पॉन्टिंग यांचा विजयाचा टक्का ७६.१४ टक्के आहे. त्याने २३० एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आणि एकूण १६५ सामने जिंकले. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोन एकदिवसीय विश्वचषक (२००३, २००७) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

4 / 5

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए यांचा विजयाचा टक्का ७३.७० टक्के आहे. त्याने १३८ सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळले, त्यात ९९ विजय मिळवले. त्याने १९९४ ते २००० संघाचे नेतृत्व केले.

5 / 5

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांचा विजयाचा टक्का ७०.४३ टक्के आहे. त्याने २०२३ ते २०२१ दरम्यान भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ९५ पैकी ६५ सामने जिंकले.

टॅग्स :ऑफ द फिल्डरोहित शर्माविराट कोहली