Join us  

IPL 2022 : सर्वाधिक षटकार ते सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू; आयपीएल २०२२मध्ये मोडले गेले '५' मोठे विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 10:21 AM

Open in App
1 / 5

भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज - जम्मू एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उम्रान मलिकने आयपीएल २०२२मध्ये सर्वात वेगवान भारतीय गोलंदाजाचा मान पटकावला. त्याने १४ सामन्यांत २२ विकेट्स घेतल्या. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात उम्रानने 157 kmph च्या वेगाने चेंडू फेकला आणि तो यंदाच्या पर्वातील भारतीयाने टाकलेला सर्वात वेगवान चेंडू ठरला. अंतिम सामन्यात गुजरातच्या ल्युकी फर्ग्युसनने १५७.३kmph च्या वेगाने चेंडू फेकून आयपीएल इतिहासातिल दुसरा वेगावान चेंडूचा मान पटकावला.

2 / 5

सर्वाधिक १०६२ षटकार - इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात सर्वाधिक १०६२ षटकार आयपीएल २०२२मध्ये लागले. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी ८७२ षटकारांचा विक्रम होता. आयपीएलच्या १५व्या पर्वात प्रती मॅच किमान १४ षटकार लागल्याची सरासरी आहे. जोस बटलरने सर्वाधिक ४५ षटकार खेचले, त्यापाठोपाठ लिएम लिव्हिंगस्टोन ( ३४) व आंद्रे रसेल ( ३२) यांचा नंबर येतो. संघांच्या बाबतीत बोलायचे तर राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक १३७ षटकार खेचले आहेत. त्यापाठोपाठ लखनौ सुपर जायंट्स ( ११५) व कोलकाता नाईट रायडर्स ( ११३) यांचा क्रमांक येतो.

3 / 5

परदेशी खेळाडूकडून सर्वाधिक धावा - राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने यंदाचे पर्व गाजवले. त्याने सर्वाधिक ८६३ धावा चोपून ऑरेंज कॅपसह अन्य सहा पुरस्कार नावावर केले. आयपीएलच्या मध्यंतरापर्यंत त्याच्या धावांची गती पाहून यंदा एका पर्वात १००० धावांचा विक्रम मोडला जाईल असे वाटले होते. पण, दुसऱ्या टप्प्यात त्याची ब‌‌‌ॅट थंडावली. पण, त्याने 863 धावा करून आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या परदेशी खेळाडूचा विक्रम नावावर केला. त्याने डेव्हिड वॉर्नरचा ८४८ धावांचा विक्रम मोडला. आयपीएलमध्ये एका पर्वात सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या ( ९७३) नावावर आहे.

4 / 5

सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू - राजस्थान रॉयल्सच्या युजवेंद्र चहलने पर्पल कॅप नावावर केली. यंदाच्या पर्वात त्याने सर्वाधिक २७ विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू तो ठरला. यापूर्वी इम्रान ताहीरने २६ विकेट्सचा विक्रम केला होता.

5 / 5

सर्वाधिक प्रेक्षक- आयपीएल २०२२ची फायनल पाहण्यासाठी १ लाख ४,८५९ प्रेक्षक काल नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होते. क्रिकेटच्या इतिहासात एका सामन्याला उपस्थित राहिलेली ही सर्वाधिक संख्या आहे. याआधी इडन गार्डनवर झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला १ लाख प्रेक्षक उपस्थित होते. २०१३-१४च्या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी ९१,११२ प्रेक्षक उपस्थित होते.

टॅग्स :आयपीएल २०२२जोस बटलरयुजवेंद्र चहलनरेंद्र मोदी स्टेडियम
Open in App