Sourav Ganguly : सौरव गांगुलीची 'विकेट' कोणी घेतली? MS Dhoniशी जवळचे संबंध असलेली व्यक्ती खरी सूत्रधार?

BCCI President Sourav Ganguly : माजी अष्टपैलू खेळाडू आणि १९८३च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अर्थात बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होणार, हे नक्की झाले आहे.

BCCI President Sourav Ganguly : माजी अष्टपैलू खेळाडू आणि १९८३च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अर्थात बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होणार, हे नक्की झाले आहे. १८ ऑक्टोबरला होणाऱ्या आमसभेत ते सूत्रे स्वीकारतील. मंगळवारी बिन्नी यांनी आपला अर्ज दाखल केला. निवडणूक ही केवळ आता औपचारिकता असेल.

जय शाह हे सचिवपदी कायम राहतील, तर आशिष शेलार यांचे नाव खजिनदार म्हणून समोर आले आहे. सध्याचे खजिनदार अरुण धुमाळ हे आयपीएल चेअरमनपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी कायम राहतील. पण, सर्वकाही गुडीगुडी असताना सौरव गांगुलीची विकेट नेमकी घेतली कुणी? हा प्रश्न त्याच्या चाहत्यांनाच नव्हे तर अनेकांना पडला आहे.

PTI ने दिलेल्या माहितीनुसार गांगुलीला इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) चेअरमनपदाची ऑफर दिली होती, परंतु माजी कर्णधाराने ती स्वीकारण्यास नकार दिले. ''सौरव गांगुलीला आयपीएल चेअरमनपदाची ऑफर दिली होती, परंतु त्याने नम्रपणे ती नाकारली. बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर त्याखालील आयपीएल चेअरमनपद स्वीकारू शकत नाही, असे त्यामागचे त्याचे लॉजिक होते. त्याने बीसीसीआय अध्यक्षपदावर कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली,''असे बीसीसाआयच्या सूत्रांनी PTI ला सांगितले.

तृणमुल काँग्रेसने ( TMC) सौरव गांगुलीने भाजपात प्रवेश नाकारल्यामुळे त्याला BCCI च्या अध्यक्षपदावरून बाजूला केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपाकडून पश्चिम बंगालच्या स्टार खेळाडूचा राजकीय बळी दिल्याचाही आरोप केला जातोय. ''राजकिय सूडाचे हे ताजे उदाहरण आहे. अमित शाह यांचे पूत्र जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी कायम राहतात, परंतु सौरव गांगुलीला पुन्ही संधी दिली जात नाही. कारण, तो ममना बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगाल राज्यातील आहे आणि त्याने भाजपात प्रवेश करण्यास नकार दिला. आम्ही तुझ्यासोबत आहोत, दादा!,''असे तृणमुल काँग्रेसचे राज्यसभा खासदार संतून सेन यांनी ट्विट केले आहे.

२०१९मध्ये गांगुलीची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाली. ऑक्टोबर २०१९मध्ये जय शाह सचिव म्हणून दाखल झाले. मागील तीन वर्ष ही दोघं बीसीसाआयचे काम पाहत आहेत आणि कोरोना काळात त्यांनी आयपीएलचे आयोजन करण्याचे शिवधनुष्य पेलले. ICCमध्ये बीसीसीआयचा प्रतिनिधी म्हणून गांगुलीचे नाव आघाडीवर आहे, पण त्यातही ट्विस्ट येऊ शकतो.

The Telegraph ने दिलेल्या वृत्तानुसार सौरव गांगुलीच्या विकेटमागे आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा यामागे हात असल्याचे समोर येतेय... एन श्रीनिवासन हे चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीचे मालकही आहेत. टेलेग्राफने दिलेल्या वृत्तानुसार एन श्रीनिवासन यांनी गांगुलीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याचा कार्यकाळ असा असक्षम होता, हे सर्वांना पटवून दिले. त्यात श्रीनिवासन यांना केंद्रीय मंत्र्याची साथ मिळाल्याचाही दावा टेलेग्राफने केलाय.

The Telegraph ने दिलेल्या वृत्तानुसार सौरव गांगुलीच्या विकेटमागे आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा यामागे हात असल्याचे समोर येतेय... एन श्रीनिवासन हे चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीचे मालकही आहेत. टेलेग्राफने दिलेल्या वृत्तानुसार एन श्रीनिवासन यांनी गांगुलीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याचा कार्यकाळ असा असक्षम होता, हे सर्वांना पटवून दिले. त्यात श्रीनिवासन यांना केंद्रीय मंत्र्याची साथ मिळाल्याचाही दावा टेलेग्राफने केलाय.