दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी कर्णधार ग्रॅमी स्मिथ सोमवारी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढला... त्यानं प्रेयसी रोमी लँफ्रांची हिच्याशी विवाह केला.
त्यानं सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचा फोटो शेअर केला.
स्मिथनं 2011मध्ये आयरिश गायिका मॉर्गन डीन हिच्याशी विवाह केला होता. त्यानंतर 2012मध्ये या जोडप्यानं मुलीला आणि 2013मध्ये मुलाला जन्म दिला.
2015मध्ये स्मिथ व मॉर्गन यांनी चार वर्षांच्या संसार मोडण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर स्मिथ आणि रोमी यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या. या दोघांनी 2016मध्ये एका मुलाला जन्म दिला आणि आज त्यांनी विवाह केला.