Join us  

Flashback 2020 : सरत्या वर्षात वन डेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप फाईव्हमध्ये एकच भारतीय

By स्वदेश घाणेकर | Published: December 27, 2020 7:48 AM

Open in App
1 / 11

२०२० मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप फाईव्ह फलंदाजांमध्ये लोकेश राहुल ( KL Rahul) या एकमेव भारतीय खेळाडूनं स्थान पटकावलं आहं.

2 / 11

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच हा या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्यानं १३ सामन्यांत ५६.०८च्या सरासरीनं ६७३ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा समावेश आहे आणि ती दोन्ही शतकं भारताविरुद्ध झळकावलेली आहेत.

3 / 11

दुसऱ्या क्रमांकावर ऑसी स्टीव्हन स्मिथ आहे. त्यानं १० सामन्यांत ६३.११च्या सरासरीनं ५६८ धावा केल्या आहेत. भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत त्यानं मालिकावीर हा पुरस्कारही पटकावला. यंदाच्या वर्षात स्मिथनं ३ शतकं झळकावली.

4 / 11

ऑस्ट्रेलियाचाच मार्नस लाबुशेन ४७३ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

5 / 11

डेव्हीड वॉर्नर ४६५ धावांसह चौथ्या स्थानावर आहे.

6 / 11

अव्वल पाच फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंचा समावेश आहे आणि लोकेश ४४३ धावांसह पाचव्या स्थानावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विराट कोहली ( Virat Kohli) ला अव्वल पाचात स्थान पटकावता आलेले नाही.

7 / 11

भारतीय कर्णधारानं ४३१ धावांसह सहावे स्थान पटकावले आहे. फक्त १२ धावांनी लोकेश राहुलनं त्यावर यंदा कुरघोडी केली. २००९नंतर प्रथमच विराटला कॅलेंडर वर्षात एकही शतक झळकावता आलेले नाही.

8 / 11

ओमानचा अकिब इलिहास दोन शतक व दोन अर्धशतकांची खेळी करून ४०० धावांसह सातव्या क्रमांकावर आहे.

9 / 11

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल ३५३ धावांसह आठव्या क्रमांकावर

10 / 11

नवव्या स्थानावर इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो ( ३४६ धावा) आहे.

11 / 11

भारताच्या श्रेयस अय्यरनं ३३१ धावांसह दहावे स्थान पटकावले आहे.

टॅग्स :फ्लॅशबॅक २०२०लोकेश राहुलविराट कोहलीअ‍ॅरॉन फिंचस्टीव्हन स्मिथडेव्हिड वॉर्नरग्लेन मॅक्सवेल