विराट कोहली ( Virat Kohli ) - विराट कोहली हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू आहे, याबाबत कुणाचेही दुमत नाही. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सोशल मीडियावरही सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या खेळाडूंमध्ये विराट हा भारतीय खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी आहे.
पॅट कमिन्स ( Pat Cummins ) - ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला नुकतंच अॅलन बॉर्डर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
लोकेश राहुल ( KL Rahul ) - विराट कोहलीसारखाच लोकेश राहुलचा मोठा चाहतावर्ग आहे. २७ वर्षीय लोकेश हा भारताचा प्रमुख खेळाडू आहे.
शुबमन गिल ( Shubman Gill ) - भारतीय संघाचा भविष्याचा स्टार म्हणून शुबमन गिलकडे पाहिले जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातही त्यानं दमदार कामगिरी केली आहे.
जेसन रॉय ( Jason Roy ) - इंग्लंडच्या फलंदाजाचं नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल.
शोएब मलिक ( Shoaib Malik ) - पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याचीही तरुणींमध्ये क्रेझ आहे. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं २०१०मध्ये त्याच्याशी विवाह केला.
फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis ) - दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस हाही तरुणींमध्ये फेमस आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजानं इमारी विसेर हिच्यासोबत लग्न केलं.
हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) - टीम इंडियाचा आणि मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसोबत लग्न केलं आणि या दोघांना पुत्रही झाला.
स्टुअर्ट ब्रॉड ( Stuart Broad ) - इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर अनेक विक्रम आहेत.
मनिष पांडे ( Manish Pandey ) - आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी मनिष पांडेची क्रेज अनेक तरुणींमध्ये आहे