दीपिका आणि भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक हे एकाच जिममध्ये वर्क आऊट करायचे. दोघांची सुरुवातीला मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण त्यावेळी दोघे लग्न करू शकत नव्हते. कारण कार्तिकचे यापूर्वी एक लग्न झाले होते.
कार्तिकचे पहिल्या बायकोबरोबर 2013 साली घटस्फोट झाला. त्यानंतर या दोघांच्या प्रेमाची बातमी मीडियामध्ये आली.
या दोघांना 2014 साली लग्न करायचे होते. पण या दोघांचे वेळापत्रक फारच बिझी होते, त्यामुळे त्यांना एक वर्ष वाट पाहावी लागली.
अखेर दीपिका आणि दिनेश या दोघांनी 2015 साली विवाह केला.
दिनेशने दीपिकाला पहिल्या मेसेजमध्येच डिनरला बोलवले होते. पण दीपिकाने त्याला नकार दिला होता.
कालांतराने दीपिका आणि दिनेश यांच्यातील जवळीक वाढली आणि ते एकमेकांना डेट करू लागले.
दीपिका आणि कार्तिक यांचे लग्न दोन वेगवेगळ्या पद्धतीने झाले.
दिनेश कार्तिकचे हे दुसरे लग्न आहे आणि हे लग्नही दोन वेगवेगळ्या पद्धतीने झाले.