भारताचा आणखी एक खेळाडू चढणार 'बोहल्यावर', 'प्रसिद्ध' गोलंदाजाचा झाला साखरपुडा

Prasidh Krishna on getting engaged : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होत आहे.

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होत आहे. बुधवारपासून या महत्त्वाच्या लढतीला सुरूवात होत आहे. अशातच भारताच्या वेगवान गोलंदाजाचा साखरपुडा पार पडला आहे.

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. फोटोंमध्ये पाहायला मिळते की, भारतीय खेळाडू आपल्या होणाऱ्या पत्नीसह आनंद साजरा करत आहे.

हळदीने रंगलेल्या अवस्थेत भारतीय खेळाडू दिसत आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रसिद्ध कृष्णा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाचा हिस्सा आहे. खरं तर दुखापतीमुळे तो आयपीएल २०२३ चा हंगाम खेळू शकला नाही.

आयपीएल २०२२ चा हंगाम प्रसिद्धसाठी एकदम खास राहिला. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात त्याने एकूण १७ सामने खेळले होते. या हंगामात त्याला १० बळी घेण्यात यश आले.

सरासरीबद्दल भाष्य करायचे झाल्यास अखेरच्या षटकांमध्ये त्याची धुलाई झाल्याचे दिसते. पण एक 'विकेट टेकर' पर्याय म्हणून तो संजू सॅमसनसाठी वेळोवेळी धावून आला.

आयपीएलमध्ये एकूण ५१ सामने खेळलेल्या प्रसिद्ध कृष्णाने ४९ बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ८.९२ एवढी राहिली.

प्रसिद्ध कृष्णाने २०२१ मध्ये इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत १४ वन डे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये २५ बळी घेण्यात यश आले आहे.

दोनवेळा ४-४ बळी घेण्याची किमया साधणारा कृष्णा तेव्हाच 'प्रसिद्ध' झाला. पण आता तो दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे.

क्रिकेटपासून दूर असलेल्या प्रसिद्धने नवीन इनिंग खेळण्यास सुरूवात केली असून तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, लोकेश राहुल यांच्यापाठोपाठ आणखी एक भारतीय खेळाडू विवाहबंधनात अडकणार आहे.