गुजरातचा संपूर्ण संघ ८९ धावांत तंबूत पाठवल्यानंतर दिल्लीने हे लक्ष्य ८.५ षटकांत ६ विकेट्स राखून सहज पार केले. या सामन्यात प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मिस्ट्री गर्लचा फोटो प्रचंड व्हायरल झाला. या मुलीला पाहताच शुबमन गिलही घायाळ झाल्याचा FAKE व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला होता.
प्रेक्षकांमध्ये बसलेली ही मुलगी स्पॅनिश अभिनेत्री आणि मॉडेल ॲना डी आर्मास हिच्यासारखी दिसत असल्याची चर्चा रंगली आहे. खरंच ही तीच अभिनेत्री आहे का? तर नाही. ही दुसरी मुलगी आहे, परंतु ती स्पॅनिश अभिनेत्रीसारखीच दिसत आहे.
ॲना डी आर्मास ही क्यूबन आणि स्पॅनिश अभिनेत्री आहे. तिने क्यूबन रोमँटिक चित्रपट 'उना रोजा डी फ्रान्सिया' मध्ये मुख्य भूमिकेतून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.
वयाच्या १८व्या वर्षी, ती माद्रिद, स्पेन येथे राहायला गेली आणि २००७ ते २०१० या सहा सीझनमध्ये 'एल इंटरनाडो' या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री म्हणून काम केले.
ॲनाचे जगभरात फॅन फॉलोअर्स आहेत. Instagram वर अभिनेत्रीचे १३.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. स्पॅनिश अभिनेत्री आणि मॉडेल ॲना खूपच हॉट आहे.