वर्ल्ड रेकॉर्ड! सबसे तेज 'मलान', बांगलादेशविरूद्ध शतक झळकावताच एका दगडात दोन पक्षी मारले

Dawid Malan becomes fastest player to score 6 ODI centuries : डेव्हिड मलानने बांगलादेशविरूद्ध शतक झळकावून नवा विक्रम केला आहे.

इंग्लंडचा सलामीवीर डेव्हिड मलानने बांगलादेशविरूद्ध शतक झळकावून नवा विक्रम केला आहे. या शतकासह त्याने बाबर आझम आणि शुबमन गिल यांना मागे टाकले.

बांगलादेशविरूद्ध नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. डेव्हिड मलानने सर्वाधिक धावा करताना १०७ चेंडूत ५ षटकार आणि १६ चौकारांच्या मदतीने १४० धावा कुटल्या.

मलानने शतकी खेळीसह अनेक विक्रमांना गवसणी घातली. मागील काही महिन्यांपासून शानदार फॉर्ममध्ये असलेल्या मलानने बाबर आणि गिलचा विक्रम मोडला. लक्षणीय बाब म्हणजे तो वन डे फॉर्मेटमध्ये सर्वात कमी डावात सहा शतके झळकावणारा खेळाडू ठरला आहे.

बांगलादेशविरुद्ध शतक झळकावून त्याने अनेक दिग्गज तसेच युवा खेळाडूंचे विक्रम मागे टाकले आहेत.

डेव्हिड मलानने वन डे फॉरमॅटच्या केवळ २३ डावांमध्ये ६ शतके झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या यादीत त्याच्या पाठोपाठ पाकिस्तानच्या इमाम-उल-हकचा नंबर लागतो.

इमामने २७ वन डे डावांमध्ये सहा शतके झळकावली होती. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी सलामीवीर उपल थरंगा आहे, ज्याने २९ डावांत ६ वन डे शतके झळकावण्याचा पराक्रम केला होता.

या यादीत चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानी संघाचा विद्यमान कर्णधार बाबर आझम आहे. त्याने वन डेच्या ३२ डावांमध्ये सहा शतके ठोकली आहेत. तर, हाशिम अमला ३४ डावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

सहाव्या क्रमांकावर भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल आहे, ज्याने वन डे फॉरमॅटच्या ३५ डावांमध्ये ६ शतके झळकावण्याचा विक्रम केला होता.

तसेच दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने ३५ डावात डावात ६ शतके झळकावली होती.

अशाप्रकारे डेव्हिड मलानने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि भारताचा सर्वोत्तम युवा खेळाडू शुबमन गिल यांचा विक्रम मोडीत काढला.