कसोटीत ९९ धावांवर विकेट्स गमावणारे फलंदाज, ब्रूकसोबत या यादीत पंत अन् MS धोनीचंही नाव

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर तर दोन वेळा ओढावलीये ही नामुष्की

भारत आणि इंग्लंड यांच्यातील लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात इंग्लंडचा स्टार बॅटर हॅरी ब्रूक ९९ धावांवर बाद झाला.

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक खेळाडूंसाठी ९९ चा आकडा हा निराश करणारा राहिला आहे. इथं एक नजर टाकुयात कसोटीतील या खास रेकॉर्डवर

हॅरी ब्रूक हा कसोटीत ९९ धावांवर बाद होणारा इंग्लंडचा १६ फलंदाज ठरला. याआधी २०१७ मध्ये जॉनी बेअरस्टोर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ९९ धावांवर बाद झाला होता.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर आपल्या कारकिर्दीत दोन वेळा कसोटीत ९९ धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. १९९७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आणि २००२ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या नॉटिंघम कसोटीत गांगुली ९९ धावांवर बाद झाला होता.

२०१० मध्ये कोलंबोच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवाग ९९ धावांवर बाद झाला होता.

महेंद्रसिंह धोनी हा पहिला कर्णधार आहे. जो ९९ धावांवर बाद झाला. २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कोसोटी सामन्यात त्याच्यावर ही वेळ आली होती. त्याने धावबादच्या स्वरुपात विकेट गमावली होती.

रिषभ पंत २०२४ मध्ये बंगळुरुच्या मैदानातील न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात ९९ धावांवर बाद झाला होता.

१९७३ मध्ये पाक-इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर मजिद खान (Majid Khan) आणि मुश्ताक मोहम्मद (Mushtaq Mohammed) यांच्यासह इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर डेनिस एमिस (Dennis Amiss) या तिघांवर ९९ धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात ही एकमेव कसोटी आहे ज्यात तीन फलंदाजाचे शतक अवघ्या एका धावेनं हुकलं होते.