Join us

ENG vs IND : बर्मिंघम कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय फलंदाज! पंतला 'टॉपर' होण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:47 IST

Open in App
1 / 8

इंग्लंड-भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना बर्मिंघमच्या मैदानात रंगणार आहे. इथं टीम इंडियाला अद्याप एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही.

2 / 8

बर्मिंघमच्या मैदानात आतापर्यंत खेळलेल्या ८ पैकी ७ कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असून एक सामना अनिर्णत राहिला आहे.

3 / 8

इथं एक नजर टाकुयात या मैदानातील कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या रेकॉर्डवर

4 / 8

बर्मिंघमच्या मैदानात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी आहे. २ कसोटी सामन्यात एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने ५७.७५ च्या सरासरीसह २३१ धावा केल्या आहेत.

5 / 8

लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी बर्मिंघमच्या मैदानात ३ कसोटी सामन्यात ३ अर्धशकांच्या मदतीने २१६ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

6 / 8

भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार आणि विकेट किपर बॅटर रिषभ पंतनं बर्मिंघमच्या मैदानात एका कसोटी सामन्यात एक शतक आणि एका अर्धशतकासह २०३ धावा केल्या आहेत. दुसऱ्या कसोटीत २९ धावांसह पंत या यादीत गावसकर आणि कोहली यांना मागे टाकू शकतो.

7 / 8

सचिन तेंडुलकरनं एजबेस्टनच्या मैदानात २ कसोटी सामन्यात एका शतकासह १८७ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

8 / 8

गुंडप्पा विश्वनाथ या दिग्गजाने बर्मिंघमच्या मैदानात दोन अर्धशतकाच्या मदतीने १८२ धावा केल्या आहेत.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंतविराट कोहलीसुनील गावसकरसचिन तेंडुलकर