Join us

Shahid Afridi Questions on Kohli’s Attitude : विराट कोहलीला असं वाटतंय का, की त्यानं सर्वकाही अचिव्ह केलं?; शाहिद आफ्रिदी बरळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 18:34 IST

Open in App
1 / 6

Shahid Afridi Questions Virat Kohli’s Attitude : पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो... त्यानं आता भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या परफॉर्मन्सकडे मोर्चा वळवला आहे. आफ्रिदीने भारताच्या माजी कर्णधाराच्या क्रिकेटप्रती समर्पणावर प्रश्न उपस्थित केला आहे.

2 / 6

विराटला 2019 पासून एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेलं नाही. तो फॉर्मशी झगडतोय. आयपीएलमध्येही तो गोल्डन डकवर बाद होताना सर्वांनी पाहिला. एकेकाळी सर्व फॉरमॅटमध्ये आघाडीवर असलेल्या विराटचा फॉर्म खराब झाला आहे. त्याच्या सध्याच्या फॉर्मबाबत बोलताना आफ्रिदी बरळला आहे.

3 / 6

विराट कोहली सातत्याने सांगतोय की तो चांगल्या टचमध्ये आहे, परंतु त्याला यश काही मिळताना दिसत नाही. सध्या आपण कुठे उभे आहोत, याचा विराटने आढावा घ्यावा असे आफ्रिदीला वाटतेय.

4 / 6

कोहलीचे पुन्हा फॉर्ममध्ये परतणे हे त्याच्या अ‍ॅटीट्यूडवर अवलंबून आहे... त्याला पुन्हा नंबर वन बनायचेय की नाही किंवा त्याने जे काही साध्य केले आहे त्यावर तो समाधानी आहे का?, असा सवाल आफ्रिदीने केला आहे.

5 / 6

Samaa TVMशी बोलताना तो म्हणाला,''क्रिकेटमध्ये अ‍ॅटीट्यूड फार महत्त्वाचा आहे. मी याचबाबत सतत बोलत आलोय. क्रिकेट खेळताना तुमच्याकडे अ‍ॅटीट्यूड आहे की नाही?. विराट कोहलीला कारकीर्दिच्या सुरुवातीला जगातील नंबर 1 फलंदाज बनायचे होते. तो आजही त्याच प्रेरणेने खेळतोय का?. हा खरा प्रश्न आहे. तो क्लास फलंदाज आहे, परंतु त्याला आता पुन्हा नंबर 1 बनावेसे वाटते का? किंवा त्याला असे वाटतेय की आयुष्यात सर्व काही अचिव्ह केलंय. आता फक्त रिलॅक्स राहायचे आणि वेळ घालवायचा? हे सर्व अ‍ॅटीट्यूडवर अवलंबून आहे.''

6 / 6

इंडियन प्रीमिअर लीग 2022मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या माजी कर्णधाराने 341 धावा केल्या आणि त्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली आहे आणि आता तो इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे.

टॅग्स :विराट कोहलीशाहिद अफ्रिदी
Open in App