इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा १२वा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने हंगामाची सुरुवात होईल. यंदाही चेन्नई आणि मुंबई इंडियन्स हे संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, यावेळी दिल्ली कॅपिटल्स ( दिल्ली डेअरडेव्हिल्स) संघाने नव्याने संघबांधणी केली असून ते मातब्बरांना धक्का देण्यासाठी सज्ज आहेत.
२०१८ च्या हंगामात दिल्लीला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. पण यंदा नवीन नावासह मैद उतरणारा दिल्लीचा संघाने जेतेपद पटकावण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांचे ११ मजबूत शिलेदार अन्य संघांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत.
शिखर धवन
कॉलीन मुन्रो
पृथ्वी शॉ
श्रेयस अय्यर ( कर्णधार)
रिषभ पंत ( यष्टिरक्षक)
ख्रिस मॉरिस
कॉलीन इंग्राम
कागिसो रबाडा
अक्षर पटेल
इशांत शर्मा
अमित मिश्रा
ट्रेंट बोल्ट