Join us

CSKच्या या 'लेडी लक'ची सोशल मीडियावर हवा; भारतीय क्रिकेटपटूशी आहे तिचं नातं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 13:37 IST

Open in App
1 / 15

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व मध्यांतरानंतर स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला. आता उर्वरित ३१ सामने यूएईत १९ किंवा २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

2 / 15

कोरोना व्हायरसमुळे प्रेक्षकांविना खेळाडूंना मैदानावर उतरावे लागत असले तरी सोशल मीडियावर प्रत्येक संघाचे चाहते आपापल्या संघाला चिअर करताना दिसले.

3 / 15

आयपीएल २०२१मध्ये SRHची मालकीण काव्या मारनची हवा होती, पण सोशल मीडियावर CSKच्या सुंदर फॅननं धुरळा केला होता.

4 / 15

चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) प्रत्येक सामन्यावर सोशल मीडियावर ही फॅन चिअर करताना दिसत होती आणि तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही फॅन्सनं लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव केला होता.

5 / 15

CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासोबतही तिचा फोटो व्हायरल झाला होता. CSKच्या या फॅनचं भारतीय संघातील खेळाडूसोबतही नातं आहे आणि त्यामुळेही तिच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

6 / 15

फक्त भारतीय क्रिकेटपटूशी असलेलं नातं हेच तिचं कर्तृत्व नाही, तर ती स्वतः एक मॉडेल आहे.

7 / 15

आयपीएलच्या ११ व्या पर्वात मिस्ट्री गर्ल म्हणून समोर आलेली ही सुंदर फॅन म्हणजे मालती चहर...

8 / 15

भारतीय व CSKचा गोलंदाज दीपक चहर याची ती बहीण आहे.

9 / 15

मालती क्रिकेट अकॅडममध्ये हातात बॅट घेऊन फलंदाजीचा अभ्यास करताना दिसली होती.

10 / 15

मालती चहरचा दुसरा भाऊ राहुल मुंबई इंडियन्सकडून खेळतो.

11 / 15

मालतीविषयी सांगायचे झाल्यास ती मिस दिल्ली या स्पर्धेसाठी रनर-अप राहिली आहे. सध्या ती मॉडलिंग करीत आहे.

12 / 15

मालतीला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे. त्यासाठी ती प्रयत्न करतानाही बघावयास मिळत आहे. सूत्रानुसार मालती लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.

13 / 15

14 / 15

15 / 15

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२१