Join us  

MS Dhoni, T20 World Cup: 24 सप्टेंबर! आजचाच तो दिवस, समोर पाकिस्तान उभा होता; धोनीने T20 वर्ल्डकप जिंकला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 8:45 AM

Open in App
1 / 10

24 सप्टेंबर 2007 (27 September 2007) चा दिवस आठवतोय? महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि भारतासाठी खूप महत्वाचा दिवस होता. सुवर्णाक्षरांत लिहिला गेला. आजपासून बरोबर 14 वर्षांपूर्वी टी-२० वर्ल्डकपची फायनल (T20 World Cup 2007) होती. समोर पाकिस्तान उभा होता.

2 / 10

टीम इंडियाने (Indian Cricket Team) पाकिस्तानला हरवत चषक जिंकला होता. ही फायनल साऊथ आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये खेळविली गेली. (India Won T20 World Cup 2007 Against Pakistan on this day)

3 / 10

हा सामना आजही खास मानला जातो म्हणजे भारतासमोर कायमचा शत्रू पाकिस्तान उभा ठाकला होता. धोनीच्या नेत-त्वात पाकिस्तानला हरवून भारताने इतिहास रचला होता. या फायनलमध्ये भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 157 रन्स बनविले होते.

4 / 10

ही मॅच तर रोमांचक होतीच, परंतू शेवची ओव्हर तर त्याहून अधिक रोमांचक होती. दोन्ही देशात सन्नाटा पसरला होता. कोण जिंकेल, कोण हरेल. कारण एका ओव्हरमध्ये 13 रन्स हवे होते.

5 / 10

धोनीसमोरही मोठा पेच होता, कोणाला ही ओव्हर द्यायची. समोर पाकिस्तानचा फलंदाज मिसबाह उल हक होता. धोनीने सर्वांना चकित करणाना निर्णय घेतला. जोगिंदर शर्मावर डाव खेळला.

6 / 10

शेवटची ओव्हर सुरु झाली, इकडे भारतीय प्रेक्षकांची धाकधूक सुरु झाली. जोगिंदर नवखा खेळाडू. त्याच्याकडे महत्वाची ओव्हर दिली, झाले, संपले अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या.

7 / 10

जोगिंदरने पहिला चेंडू टाकला. वाईड निघाला. झाले, 6 चेंडूत 12 धावा. जोगिंदरने दुसरा चेंडू टाकला. मिसबाहला तो खेळता आला नाही. 5 चेंडूवर 12 रन्स हवे होते.

8 / 10

दुसरा चेंडू जोगिंदरने फुलटॉस टाकला, मिसबाहने सिक्स मारला. पारडे एका चेंडूत फिरले. भारताच्या गोटात सन्नाटा आणि पाकिस्तानच्या गोटात जल्लोष सुरु झाला. चार चेंडूंवर 6 रन्स हवे होते.

9 / 10

जोगिंदरने तिसरा चेंडू टाकला मिसबाहने स्कूप शॉट खेळला. वाटले आता भारताचा खेळ खल्लास. पण हवेत झेपावलेला चेंडू श्रीसंतच्या हातात विसावला आणि अख्खे स्टेडिअम दणाणले.

10 / 10

भारताने मॅच जिंकली होती. जोगिंदर शर्मा हिरो ठरला होता. धोनीने इतिहास रचला होता. हाच तो दिवस! 27 September 2007.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ
Open in App