Join us  

IPL मधून माघार तरीही 'ऑरेंज कॅप' डेव्हिड वॉर्नरचीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 12:51 PM

Open in App
1 / 4

सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर राष्ट्रीय कर्तव्यासाठी मायदेशात रवाना झाला असला तरी आयपीएलच्या 12व्या मोसमात त्यांनी रचलेल्या धावांचे शिखर सर करणे कोणाला शक्य नाही. ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरने 12 सामन्यांत 1 शतक व 8 अर्धशतकांसह 692 धावा केल्या आहेत आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो अव्वल स्थानावर आहे. आयपीएलच्या उर्वरित चार सामन्यांतही त्याच्या आसपास कोणी पोहचू शकणार नाही. त्यामुळे यंदाची ऑरेंज कॅप ही वॉर्नरच्याच नावावर राहणार आहे.

2 / 4

वॉर्नरव्यतिरिक्त के. एल. राहुल (593) आणि आंद्रे रसेल (510) यंदाच्या मोसात आतापर्यंत 500 पेक्षा अधिक धावा फटकावण्यात यशस्वी ठरले आहेत. पण या दोघांचे संघ अनुक्रमे किंग्स इलेव्हन पंजाब व कोलकाता नाईट रायडर्स साखळी फेरीतच गारद झाले.

3 / 4

वॉर्नरला आता मुंबई इंडियन्सचा क्विंटन डी कॉक व दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन यांच्याकडून आव्हान मिळू शकते. डी कॉकने 492 धावा केल्या असून, त्याला अद्याप तीन सामने खेळण्याची संधी आहे. त्यात तो 200 पेक्षा अधिक धावा फटकावण्यात यशस्वी ठरला तर तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरू शकतो. हीच स्थिती धवनची आहे. त्याच्या नावावर 486 धावांची नोंद आहे.

4 / 4

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर (446) व रिषभ पंत (401) प्रत्येक सामन्यात मोठी खेळी करीत ऑरेंज कॅपसाठी दावेदारी सादर करू शकतात.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरआयपीएल 2019