चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेन्द्र चहल ही नवी स्पिनर जोडी भारतीय संघाला मिळाली आहे. कुलदीपने स्ट्रेलियाविरोधात हॅट्ट्रिक घेतली.
दुस-या टोकाकडून युजवेन्द्र चहलदेखील भन्नाट गोलंदाजी करत आहे. ऑस्ट्रेलियाला या दोघांनी हैराण करुन सोडले आहे.
कुलदीप यादवचा असाच फॉर्म कायम राहिला, तर रविंद्र जाडेजाच्या संघातील स्थानाला धोका निर्माण होऊ शकतो. दोघेही डावखुरे फिरकी गोलंदाज आहेत.
रविचंद्रन अश्विनला सध्या विश्रांती देण्यात आली आहे.पण त्याच्यासाठी सुद्धा धोक्याची घंटा आहे. संघात पुनरागमन केल्यानंतर सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा त्याच्यावर दबाव असेल.