Join us

"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 19:18 IST

Open in App
1 / 7

IPL 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी खूपच खराब झाली आहे. पहिल्या ९ सामन्यांनंतर हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. आता मोठा प्रश्न असा की, पुढच्या वर्षी या संघाचे काय होणार?

2 / 7

महेंद्रसिंग धोनी पुन्हा पुढच्या हंगामात खेळणार का? यावर नव्याने चर्चा रंगली आहे. या मुद्द्यावर बोलताना धोनी ज्याला आदर्श मानतो, त्या ऑस्ट्रेलियन दिग्गज आणि IPL विजेता कर्णधार अँडम गिलख्रिस्टने मोठे विधान केले आहे.

3 / 7

गिलख्रिस्टने धोनीबाबत अतिशय रोखठोक मत व्यक्त केले आहे. पुढील आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जला धोनीची गरज नाही, त्याने पुढला सीझन खेळू नये, असे गिलख्रिस्ट स्पष्टपणे म्हणाला आहे.

4 / 7

क्रिकबझशी बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला, 'धोनीला काहीही सिद्ध करायची गरज नाही. त्याला काय हवंय ते त्याला माहितीये. पण संघाच्या भविष्यासाठी मला वाटतं की पुढच्या वर्षीपासून धोनीने आयपीएलमध्ये खेळू नये.'

5 / 7

'माझा धोनीवर विश्वास आहे. तो चॅम्पियन खेळाडू आहे. पण पुढल्या वर्षी धोनी ४४ वर्षांचा असेल. त्याची विकेटकीपिंग अजूनही चांगली आहे, पण फलंदाजी प्रभावी नाही. तो 'मॅच फिनिशर' राहिलेला नाही. आता त्याने थांबायला हवे.'

6 / 7

'आधी कुठल्याही कठीण परिस्थितीत तो चेन्नईसाठी सामना जिंकवून देऊ शकत होता, पण आता तसे घडताना दिसत नाही. त्यानेही ही गोष्ट स्वीकारायला हवी. तसेच, गुडघ्याची दुखापत अद्याप बरी झालेली नाही. त्यामुळे त्याने पुढे खेळू नये.'

7 / 7

चेन्नई सुपर किंग्जने ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि आयुष म्हात्रे यांना रिटेन करावं असे मतही गिलख्रिस्टने व्यक्त केले आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सरवींद्र जडेजा