पुजाराशिवाय या भारतीय क्रिकेटर्ससाठी PM मोदींनी केलीये 'मन की बात'

PM मोदी खेळाचं मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. इथं एक नजर टाकुयात पुजाराशिवाय त्यांनी कोणत्या क्रिकेटर्सचं खास शब्दांत कौतुक केलं होतं त्यासंदर्भातील गोष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या चेतेश्वर पुजाराला पत्र लिहून त्याचे अभिनंदन केले. पुजाराने पंतप्रधान मोदींकडून मिळालेले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. इथं एक नजर टाकुयात मोदींनी खास कौतुक केलेल्या क्रिकेटर्सवर

१५ ऑगस्ट २०२० मध्ये सुरेश रैनानं आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावेळी पंतप्रथन मोदींनी त्याला पत्र लिहिले होते. या पत्रात रैनाच्या खेळातील गुणवत्ता विशेष करून फिल्डिंगमधील त्याची चपळाई, संघासाठीची बांधिलकी यावर फोकस करत मोदींनी सुरेश रैनाच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानाला दाद दिली होती.

भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं देखील १५ ऑगस्ट २०२० मध्ये सोशल मीडियावरील एका पोस्टसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यालाही PM मोदींनी भावनिक आणि सन्मानपूर्वक पत्र लिहिलं होतं. या पत्रात एमएस धोनीचे नेतृत्व, शांत स्वभाव, युद्धातल्या योद्ध्यासारखी तयारी आणि नव्या इंडियाचं प्रतीक अशा शब्दांत मोदींनी यशस्वी कर्णधाराचं कौतुक केलं होतं.

महिला क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या भारतीय संघाच्या माजी कर्णधार मिताली राजसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात'च्या कार्यक्रमातून कौतुक केले होते. भारतीय क्रिकेटमधील हा चेहरा महिला सशक्तीकरणाचं उत्तम उदाहरण आहे, असा उल्लेख मोदींनी केला होता.

आर. अश्विन याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यात अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या क्रिकेटरसाठीही मोदींनी खास पत्र लिहिले होते. कॅरम बॉलनं फलंदाजांना चकवा देतो तसाच त्याने अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले, असे म्हणत मोदींनी अश्विनच्या क्रिकेटमधील अविस्मरणीय कामगिरीचा उल्लेख या पत्रात केला होता.

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटर अन् सिक्सर किंग युवराज सिंग याच्यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१७ मध्ये खास पत्र लिहिले होतं. युवीनं YouWeCan फाउंडेशन च्या माध्यमातून कर्करोग जनजागृती आणि मदतीचे काम सुरु केले आहे. या समाज कार्यासाठी मोदींनी युवीचं कौतुक केले आहे.

२०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी संघातील खेळाडूंची भेट घेऊन या स्पर्धेत जे प्रयत्न केले ते काही कमी नव्हते, असे म्हणत संघाला प्रोत्साहन दिल्याचे पाहायला मिळाले होते.

२०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर पंतप्रधान मोदींनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे खास कौतुक केल्याचे पाहायला मिळाले होते.

IPL २०२५ च्या स्पर्धेत धुमाकूळ घालणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीही पंतप्रधानांकडून दादा मिळवणाऱ्या क्रिकेटर्सच्या यादीत आहे. PM मोदींनी पटना विमानतळावर युवा क्रिकेटरची थेट भेट त्याची पाठ थोपटली होती.