युजवेंद्र चहल फक्त क्रिकेटरच नाही, तर आहे मोठा सरकारी अधिकारी; महिन्याचा पगार माहितीये का?

क्रिकेटरच नाही तर भारताच्या आयकर विभागातही युजवेंद्र चहल करतो काम, महिन्याला मिळतात इतके पैसे

भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. चहलच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे.

खरं तर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे क्रिकेटविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल...पण, सध्या मात्र त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत.

चहल्या आणि धनश्रीच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलो केल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

युजवेंद्र चहल हा भारताचा स्टार गोलंदाज आहे. पण, क्रिकेटर असण्याबरोबरच तो एक इनकम टॅक्स ऑफिसरही आहे.

२०१८ मध्ये भारताच्या आयकर विभागात स्पोर्टस कोटामधून त्याला प्राप्तीकर अधिकारी (इनकम टॅक्स ऑफिसर) म्हणून नोकरी देण्यात आली.

सध्याच्या ग्रेडनुसार चहलला प्राप्तीकर अधिकारी म्हणून ४४ हजार ९०० रुपये ते १ लाख ४२ हजार ४०० रुपये इतका पगार मिळत असल्याची माहिती आहे.

अलिकडेच पार पडलेल्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये युजवेंद्र चहल हा लिलावातील सर्वात १० महागड्या खेळाडूंपैकी एक ठरला होता.

पंजाब किंग्ज संघाने त्याला १८ कोटींची बोली लावून विकत घेतलं होतं.