Join us

स्टार क्रिकेटरनं शेअर केली साराह सोबतच्या साखरपुड्याची गोष्ट; रोमँण्टिक फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 15:12 IST

Open in App
1 / 9

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर क्रिकेटर मार्कस स्टॉयनिस याने सोशल मीडियाच्या माध्यमातून खास फोटो शेअर करत साखरपुडा उरकल्याची माहिती दिली आहे.

2 / 9

काल परवा नव्हे तर २०२१ मध्येच ऑस्ट्रेलियन ऑलराउंड साराह झार्नु (Sarah Czarnuch) हिच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला होता. अनेक वर्षे डेटिंगनंतर या जोडीनं आता आयुष्याच्या प्रवासाच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

3 / 9

स्पेनमधील भूमध्य समुद्राच्या साक्षीनं क्रिकेटरनं आपल्या लाँगटाइम गर्लफ्रेंडला फिल्मी स्टाईल प्रपोज करत एंगेजमेंट रिंग दिली.

4 / 9

८ सप्टेंबरला साराह आणि स्टॉयनिस या जोडीनं रोमँण्टिक फोटो शेअर करत साखरपुड्याची गोष्ट जगजाहिर केली आहे. स्पेनच्या समुद्र किनाऱ्या लगत असलेल्या बोटीतील दोघाेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

5 / 9

स्पेनच्या किनाऱ्यावर आयुष्यातील जोडीदाराला होकार देणं हे माझ्यासाठी अगदी सोप टास्क होते, या खास कॅप्शनसह साराहनं ३ सप्टेंबर २०२५ हा आयुष्यातील खास दिवस होता, ही गोष्ट शेअर केलीये.

6 / 9

२७ वर्षीय साराह ही सौंदर्याची जणू खाणचं. ती ऑस्ट्रेलियन मॉडलसह केंटेट क्रिएटर आणि सौंदर्य प्रसाधनांच्या व्यवसायातील सक्रीय अन् लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखली जाते.

7 / 9

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्य स्थित गीलॉन्ग येथे ७ डिसेंबर १९९७ मध्ये साराचा जन्म झाला. २०१२ मध्ये मिस टूरिझम ऑस्ट्रेलिया ही सौंदर्य स्पर्धा जिंकून ती प्रकाशझोतात आली.

8 / 9

ऑस्ट्रेलियातील डिकिन विद्यापीठातून पत्रकारिता आणि जनसंपर्क या विषयात उच्च शिक्षण घेतल्यावर तिने फॅशन आणि मीडिया जगतात आपली खास ओळख निर्माण केलीये.

9 / 9

साराने इंटरनॅशनल रॅम्प वॉक्स, GT Magazine साठी ब्यूटीसंदर्भातील कॉलम लिखाणासाठीही ओळखली जाते. Sarah Czarnuch × Elliatt या ब्रँडसह ती फॅशन क्षेत्रात सक्रीय आहे. सोशल मीडियावर तिच्या फॉलअर्सचा आकडा हा १.२९ लाखाच्या घरात आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डव्हायरल फोटोज्