स्टिव्ह स्मिथ: स्टिव्ह स्मिथ त्याच्या बुटाची लेस कायम सॉक्समध्ये घालतो. तो बुटाची लेस बाहेर ठेवत नाही. फलंदाजी उभं राहत असताना खाली पाहिल्यावर लेस दिसू नये, यासाठी स्मिथ असं करतो.
लसिथ मलिंगा: श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मलिंगा चेंडू टाकण्याआधी, रन-अपला सुरुवात करण्याआधी चेंडूला किस करतो.
मखाया एनटिनी: दक्षिण आफ्रिकेचा हा माजी क्रिकेटपटू गुडलकसाठी त्याच्या किटमध्ये कायम शेण ठेवायचा. त्याच्या किटमध्ये कायम एका प्लास्टिकच्या पिशवीत गायीचं शेण असायचं.
स्टिव्ह वॉ: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार कायम त्याच्यासोबत लाल रंगाचा रुमाल आणायचा.
सनथ जयसूर्या: श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्या गोलंदाजाचा सामना करण्याआधी त्याच्या हेल्मेट, पॅडला स्पर्श करायचा.