दीपक चहर आणि राहुल चहर हे दोन चुलत भाऊ सध्या भारतीय संघात खेळत आहे. बऱ्याच वर्षांनंतर दोन भाऊ एकत्रितपणे संघात खेळल्याचे पाहायला मिळत आहे.
हार्दिक आणि कृणाल ही पंड्या बंधूंची जोडीही आपण सर्वांनी भारतीय संघाकडून खेळताना पाहिली आहे. मुंबई इंडियन्सकडून ही जोडी पहिल्यांदा आपण एकत्रपणे पाहिली होती.
इरफान आणि युसूफ हे पठाण बंधूही भारताकडून खेळले आहेत. इरफानने भारताकडून 2003 साली पदार्पण केले होते. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजेच 2007 साली युसूफने ट्वेन्टी-20 विश्वचषकात भारताकडून पदार्पण केले होते.
भारताकडून खेळणारे लाला अमरनाथ यांची मोहिंदर आणि सुरिंदर हे दोन पुत्रही भारताकडून खेळले. भारताने 1983 साली विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मोहिंदर यांनी सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.