क्रिकेट विश्वात बॉलर आणि बॅट्समन आंतरराष्ट्रीय स्तरावर लाखो रुपयांची कमाई करतात. क्रिकेट खेळणाऱ्यांनाच या क्षेत्रात प्रवेश करता येतो असं नाही तर न खेळताही चांगले शिक्षण घेऊन क्रिकेटच्या क्षेत्रात प्रवेश करता येतो. जर क्रिकेटची आवड आहे मात्र खेळता येत नाही तरीही तुम्ही या क्षेत्रात करिअर बनवू शकता.
मॅच रेफरीला प्रतिदिन 30 हजार रुपये मिळतात. आईसीसीच्या नियमाचे उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी मॅच रेफरीची असते. यासाठी क्रिकेटचे सगळे नियम तंतोतंत ज्ञात असणे गरजेचे असते. त्याचसोबत परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी त्यांना भत्ते दिले जातात.
व्हिडीओ एनालिस्टसाठी प्रतिदिन 15 हजार रुपये दिले जातात. दोन टीममधील मॅचचे व्हिडीओ एनालिस्ट करणे सोपे काम नाही. कोणत्या टीमचे बॅट्समन आणि बॉलर यांच्यात काय कमी आहे याची माहिती द्यावी लागते. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी तांत्रिक ज्ञानासोबत क्रिकटचे बारकावे समजून घेणे गरजेचे आहे.
क्रिकेट स्टेटिस्टीशियन यामध्ये मॅचमधील आकड्यांचे गणित जुळवून त्याद्वारे विश्लेषण करण्याची कला तुमच्या अंगात असणे गरजेचे आहे. कोणत्या खेळाडूने किती रन्स बनवले, किती विकेट घेतल्या याची आकडेवारी नोंद करण्याचं काम केलं जातं. यासाठी प्रतिदिन 10 हजार रुपये मिळतात
क्युरेटर बनून महिन्याला कमवा 1 लाख रुपये. क्रिकेटच्या पिचबाबत माहिती, माती त्याची गुणवत्ता अशाप्रकारे ते ग्राऊंड खेळण्यासाठी किती फायदेशीर आहे. वैगेरे अशी माहिती असणे आवश्यक आहे. बीसीसीआयकडून याचा कोर्स दिला जातो. क्युरेटर महिन्याला 1 लाख रुपये पगार आहे.
क्रिकेट किट मॅन्युफेक्चर बनून लाखो रुपयांची कमाई करा. क्रिकेटसाठी लागणारे बॉल, बॅट्स, पॅड्स अशा वेगवेगळ्या वस्तू बनवून विकण्याचा मोठा फायदा होता.
क्रिकेटर्सचे मॅनेजर - प्रसिद्ध खेळाडूंचे मॅनेजर होण्याची संधी असते. यासाठी क्रिकेट टीमचा खर्च, त्यांच्या आवश्यक असणाऱ्या गरजांची पूर्तता करणे, त्यांच्या सुविधांची काळजी घेणे अशी जबाबदारी पार पाडावी लागते. यासाठी वर्षाकाठी 15 लाख रुपये मिळतात.
अंपायर बनून कमवा 40 लाख रुपये सॅलरी. अंपायर बनण्यासाठी राज्यस्तरीय स्पोर्ट्स बॉडी प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा द्यावी लागते. जर या परीक्षेत पास झाला तर बीसीसीआयकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत बसण्यासाठी पात्र मानलं जातं. अंपायर महिन्याला 40 लाख कमवितात तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही रक्कम दुप्पट होते.
जर्नलिस्ट आणि पीआरची संधी - जर तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल तर तुम्ही ब्लॉगर, क्रिकेट जर्नलिस्टमध्ये आपलं करिअर बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला क्रिकेट समजणं गरजेचे आहे. तसेच खेळाडूंचा पीआर म्हणूनही तुम्ही काम करु शकता. यामध्ये वर्षाला लाखो रुपयांची कमाई आहे.