सौरव गांगुलीचा 'डबल' गेम झाला! BCCI चं अध्यक्षपद गेलं अन् जय शाह अँड टीमने आणखी एक धक्का दिला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सर्वानुमते वर्ल्ड कप विजेते रॉजर बिन्नी यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली गेली. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याचा ३ वर्षांच्या कार्यकाळाचा आज अखेर शेवट झाला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सर्वानुमते वर्ल्ड कप विजेते रॉजर बिन्नी यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली गेली. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याचा ३ वर्षांच्या कार्यकाळाचा आज अखेर शेवट झाला.

आज गांगुलीचे अध्यक्षपद गेलेच शिवाय BCCI कडून त्याला दुसरा मोठा धक्काही बसला. बैठकीसाठी उपस्थित असलेल्या गांगुलीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. वाढलेली दाढी ठेऊन गांगुली जेव्हा बैठकीच्या स्थळी पोहोचला, तेव्हा तो उदास असल्याचे प्रकर्षाने जाणवले.

२०१९मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गांगुलीसमोर कोरोनाचं मोठं संकट उभं राहिलं. त्यातही त्याने BCCI च्या टीमला सोबत घेऊन इंडियन प्रीमिअर लीगचे आयोजन युएई व भारतात करून दाखवला.

'दादा' BCCIच्या अध्यक्षपदावर कायम राहायचे होते, परंतु बीसीसीयच्या सदस्यांनी त्याला विरोध केल्याच्या चर्चा रंगल्या. माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन त्या विरोधकांमध्ये अग्रस्थानी असल्याचेही सांगण्यात आले. गांगुलीने यावर कोणतेच भाष्य केले नाही, परंतु बीसीसीआचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी या अफवा असल्याचे सांगितले.

गांगुलीला BCCIच्या अध्यक्षपदाच्या बदल्यात आयपीएल चेअरमनपदची ऑफरही देण्यात आली होती, परंतु बंगाल टायगरने ती नाकारली. त्याल आयसीसीवर पाठवले जाईल अशीही शक्यता होती, परंतु तिही आज मावळली. गांगुलीने पुन्हा क्रिकेट असोसिएशन बंगालच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा निर्णय घेतला.

आज झालेल्या बैठकीत BCCIने आयसीसीच्या चेअरमनपदी सध्या विराजमान असलेल्या ग्रेग बार्कली यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ गांगुलीला ICC चेअरमनपदी पाठवण्याचा निर्णयही रद्द केला गेला. आयसीसीमध्ये बीसीसीआयचे सदस्य म्हणून दोन नावं पाठवायची आहेत आणि जय शाह यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

दादाने BJP प्रवेशास नकार दिल्याने त्याला ही वागणूक दिल्याचा आरोप तृणमुल काँग्रेसकडून केला गेला. त्यात आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banarjee) यांनी या वादात उडी घेतली होती.

''मी पंतप्रधानांना विनंती करतो की सौरव गांगुलीला ICCची निवडणूक लढवण्याची परवानगी दिली पाहिजे. तो एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे, म्हणूनच त्याला वंचित ठेवले जात आहे. सरकारने राजकीय निर्णय घेऊ नये, क्रिकेट, खेळासाठी निर्णय घ्यावा अशी विनंती. तो राजकीय पक्षाचा सदस्य नाही,''असे बॅनर्जी म्हणाल्या होत्या.