Join us  

Birthday Special : सुनील गावसकर यांच्यावर फिदा होती 'ही' बॉलीवूड अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 2:36 PM

Open in App
1 / 6

क्रिकेट आणि बॉलीवूड कायमच चर्चेत असतात. अभिनेत्रींना पाहून क्लिन बोल्ड होणाऱ्या क्रिकेटपटूंची संख्या काही कमी नाही. मात्र लिटिल मास्टर सुनील गावसकर यांची कहाणी थोडी वेगळी नाही. इतर क्रिकेटपटू अभिनेत्रींच्या सौंदर्यानं क्लिन बोल्ड असताना गावसकरांवर मात्र बॉलीवूडची एक अभिनेत्री फिदा होती.

2 / 6

गावसकरांवर फिदा असणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे माधुरी दीक्षित. माधुरी कायमच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत राहिली आहे. तिच्या अफेयर्सच्या चर्चादेखील अनेकदा व्हायच्या.

3 / 6

माधुरी दीक्षितला एके काळी सुनील गावसकर प्रचंड आवडायचे.

4 / 6

खुद्द माधुरीनं 1992 मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं होतं. आपल्याला सुनील गावसकर अतिशय आवडतात, असं त्यावेळी तिनं सांगितलं होतं.

5 / 6

त्यावेळी माधुरी केवळ 25 वर्षांची होती, तर सुनील गावसकर 43 वर्षांचे होते. त्यावेळी सुनील गावसकरांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. माधुरीनं केलेल्या त्या गौप्यस्फोटानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

6 / 6

2018च्या आयपीएल दरम्यान माधुरी आणि सुनील गावसकर एकमेकांना भेटले होते. धक-धक गर्ल माधुरीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन गावसकरांसोबतचा फोटो शेयर केला होता.

टॅग्स :सुनील गावसकरमाधुरी दिक्षितबॉलिवूडक्रिकेटकरमणूक