वर्षभरात विराट कोहलीनं 11 शतक आणि दहा अर्धशतक झळकावली आहेत. यामध्ये तीन द्विशतकाचा समावेश आहे. तिन्ही प्रकारात विराट कोहलीनं 46 सामन्यात 2818 धावा केल्या आहेत. 10 कसोटीमध्ये 1059, 26 वन-डेत 1460 आणि दहा टी-20त 299 धावा केल्या आहे.
2017 मध्ये रोहित शर्मा 21 वन-डे सामने खेळला. यामध्ये त्यानं 1293 धावा काढताना सहा शतके आणि पाच अर्धशतकासह ठोकली. यामध्ये लंकेविरोधीत 208 धावांची खेळी अविस्मर्णिय होती. लंकेविरोधात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 35 चेंडूत शतक झळकावत हीटमॅननं आपला आक्रमकपणा दाखवून दिला
2017 मध्ये हार्दिकनं 28 वन-डे सामने खेळले. यामध्ये त्यानं सहाशे धावा आणि 31 विकेट घेतल्या. नऊ टी-20मध्ये त्यानं 62 धावा आणि पाच बळी मिळवले.
23 वन-डे मध्ये बुमराहनं 39 बळी घेतले आहेत. यावेळी 37 धावांवर पाच ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली आहे. 2017मध्ये खेळलेल्या दहा टी-20त बुमराहनं 12 बळी मिळवलेत
2017मध्ये अश्विननं 11 कसोटी सामने खेळले यामध्ये त्यानं 54 बळी घेतलेत. यावेळी 41 धावांच्या मोबदल्यात सहा बळी ही अश्विनची सर्वोत्कृष्ट कामिगिरी आहे. सर्वांत कमी कसोटी सामन्यात 300 बळींचा टप्पा पार केला