इंग्लंडचा यशस्वी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस... या निमित्तानं स्टोक्सनं पत्नी क्लेयर रॅटक्लिफसोबतचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या फोटोत बेन व क्लेयर एकमेकांना किस करताना पाहायला मिळत आहेत.
14 ऑक्टोबर 2017 मध्ये बेन व क्लेयर यांनी लग्न केले. बेन व क्लेयर यांना लेयटन व लिबी अशी दोन मुलं आहेत.
क्लेयरचे वडील ऑर्थर हे क्रिकेट चाहते होते आणि ते लँकशायर संघाला सपोर्ट करायचे आणि ते क्लेयरला क्रिकेटपटूशीच लग्न कर असं नेहमी सांगायचे
ऑगस्ट 2010मध्ये क्लेयर कुटुंबीयांसोबत लँकशायर व डरहॅम यांच्यातील सामना पाहण्यासाठई ओल्ड ट्रॅफर्डला गेले होते. तेथे बेन व क्लेयर यांच्यात नजरानजर झाली.
टीशर्टवरील नाव पाहून क्लेयरनं सामना संपण्यापूर्वी बेनला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली.