आयुष्यामध्ये अशी काही वळणं येतात की तुम्ही ज्या गोष्टीचा विचारही केला नाही त्या गोष्टी होतात.
तिच्या आयुष्यातही असंच घडलं...
तिचा खरं तर क्रिकेटशी काहीही संबंध नव्हता, पण...
तरीही तिचं भारतीय क्रिकेट संघातील 'चॉकलेट बॉय'शी लग्न झालं.
भारतीय संघातील हा 'चॉकलेट बॉय' म्हणजेच सुरेश रैना.
सुरेश आणि प्रियंका हे बालपणीचे मित्र. लहानपणी ते एकाच कॉलनीत राहायचे. प्रियंकाचे कुटुंब दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले आणि या दोघांचा संपर्क तुटला.
प्रियंकाचे बाबा हे सुरेशचे शाळेमध्ये क्रीडा शिक्षक होते, तर या दोघांच्या आई या चांगल्या मैत्रिणी होत्या.
बराच काळ सुरेश आणि प्रियंका हे संपर्कात नव्हते. पण २००८ साली या दोघांनी विमानतळावर पुन्हा एकदा भेट झाली. त्यावेळी सुरेश आयपीएलसाठी बंगळुरुला जात होता, तर प्रियंका ही नेदरलँड्सला आपल्या जॉबसाठी चालली होती. तेव्हा या दोघांचे बोलणे झाले.
सुरेश जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये होता तेव्हा त्याच्या आईने त्याला कॉल करून तुझे लग्न ठरवल्याचे सांगितले. रैनाने यावेळी आईला विचारले की, ती मुलगी आहे तरी कोण? त्यावेळी आईने सुरेशला प्रियंकाचे नाव सांगितले.
आपले लग्न प्रियंकाबरोबर झाल्याचे समजताच सुरेशने तिला फोन केला आणि ही माहिती दिली.
त्यानंतर हे दोघे एकमेकांना बऱ्याचदा भेटले.
रैना पाच महिन्यांनंतर भारतात दाखल झाला आणि ३ एप्रिल २०१५ या दिवशी सुरेश आणि प्रियंका यांचे लग्न झाले.
आता सुरेश आणि प्रियंका यांना एक गोड मुलगी आहे.
आज सुरेश रैनाचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यातील ही गोष्ट पुढे आली आहे.