टीम इंडियाचे ६ खेळाडू झाले फेल! नेमकी काय आहे BCCI ची नवी फिटनेस टेस्ट?

Team India Fitness Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतलेल्या नवी फिटनेस टेस्टची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण या टेस्टमध्ये ६ खेळाडू फेल झालेत. पण अशी नेमकी ही फिटनेस आहे तरी काय? हे आपण जाणून घेऊयात...

भारतीय क्रिकेट संघात निवड होण्यासाठी खेळाडूंना यो-यो टेस्टमध्ये पास व्हावं लागतं. पण बीसीसीआयनं यासोबतच आता आणखी एक नवी फिटनेस टेस्ट सुरू केली आहे. याच नव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचे ६ खेळाडू नापास झालेत. (फाइल फोटो)

बीसीसीआयने आता २ किलोमीटर फिटनेस टेस्ट नावानं नवी फिटनेस टेस्ट सुरु केलीय. यात संजू सॅमसन, ईशान किशन, नितीश राणा, राहुल तेवतिया, सिद्धार्थ कौल आणि जयदेव उनाडकट हे सहा खेळाडू नापास झाले आहेत.

बीसीसीआयच्या २ किमी फिटनेस टेस्टमध्ये नापास झालेल्या खेळाडूंना पुन्हा एकदा दुसरी संधी दिली जाणार आहे. पण दुसऱ्या संधीतही ते नापास होणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळणार नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बीसीसीआयने ही नवी फिटनेस टेस्ट घेतली आहे.

बीसीसीआयने याआधी जेव्हा यो-यो फिटनेस टेस्ट सुरू केली होती. त्यावेळी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फलंदाज अंबाती रायुडू यात नापास ठरले होते. त्यांना फिटनेवर आणखी काम करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या व त्यानंतरच त्यांना संघात संधी देण्यात आली होती.

आता २ किमी फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरलेल्या खेळाडूंमध्ये संजू सॅमसन हे एक मोठं नाव आहे. संजू याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाकडून खेळला होता आणि आता इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही तो पाहायला मिळेल अशी आशा आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने होणार आहेत.

इंग्लंड विरुद्धच्या सध्या कसोटी मालिकेत व्यग्र असलेल्या वरिष्ठ खेळाडूंना २ किमी फिटनेस टेस्टमधून सवलत देण्यात आली आहे.

भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारीपासून चेन्नईमध्ये खेळविण्यात येणार आहे.

यो-यो चाचणी ही सर्वात कठीण फिटनेस चाचणी आहे. यात चाचणीमध्ये याआधी अनेक दिग्गज खेळाडू फेल झाले होते. सुरेश रैना आणि युवराज सिंग २०१७ साली या चाचणीत फेल झाले होते. भारतीय संघात जागा निश्चित करण्यासाठी यो-यो टेस्टमध्ये पास होणं बंधनकारक आहे. या टेस्टमध्ये पास होण्यासाठी खेळाडूला कमीतकमी १६.१ इतके गुण प्राप्त करावे लागतात.