भारतीय संघाने सराव सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यापूर्वी भारताच्या खेळाडूंची सराव सामन्यात कशी कामगिरी होती, याची उत्सुकता होती. यात फलंदाज पास झाले, परंतु गोलंदाजांना अपयश आले.
भारताचा पहिला डाव 358 धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादशने 544 धावा केल्या. अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, विराट कोहली, हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतक झळकावले.
पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलने दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली.
मुरली विजयने खणखणीत शतक झळकावून ऑस्ट्रेलिया संघाला धोक्याचा इशारा दिला आहे.
पृथ्वी शॉची दुखापत ही भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.
गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी वगळता अन्य गोलंदाजांनी निराश केले.