भारतीय संघ सध्या इंदूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यासाठी दाखल झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्याला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी 'या' जोडीसाठी बांगलादेशने खास रणनीती आखल्याचे दिसत आहे.
कर्णधार विराट कोहली आणि रोहित ही सर्वात अनुभवी जोडी भारताकडे आहे.
उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा, ही कसोटी क्रिकेटमधील सर्वात महत्वाची जोडी समजली जाते.
रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल या सलामीच्या जोडीने प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणले आहे.
गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी हा घातक ठरू शकतो. यापुढे त्याला भुवनेश्वर कुमारची साथ मिळणार का, हे पहावे लागेल.
रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन या जोडीचा धसका सध्या बांगलादेशच्या संघाने घेतला आहे. या दोघांच्या फिरकीसाठी बांगलादेशने खास रणनीती आखल्याचे म्हटले जात आहे.