Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC U19 World Cup : युवा टीम इंडियाचा 'सिक्सर' अन् मराठमोळा आयुष म्हात्रे थेट किंग कोहलीच्या पंक्तीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 03:15 IST

Open in App
1 / 9

आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील १९ वर्षांखालील युवा टीम इंडियाने झिम्बाब्वेच्या मैदानात इतिहास रचला आहे.

2 / 9

वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज शतकी खेळीसह कर्णधार आयुष म्हात्रेच्या अर्धशतकासह अन्य फलंदाजांनी केलेल्या तगड्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची फायनलची लढाई ४०० पार धावांची केली होती.

3 / 9

इंग्लंडच्या संघाला १०० धावांनी पराभूत करत भारतीय संघाने विक्रमी विजयासह सहाव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरत या स्पर्धेतील जेतेपदाचा विश्वविक्रम आणखी मजबूत केला. या ऐतिहासिक कामगिरीसह आयुष म्हात्रे थेट विराट कोहलीच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. इथं एक नजर टाकुयात भारतीय संघाला अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणाऱ्या कर्णधारांवर...

4 / 9

भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने १९९९ मध्ये भारतीय संघाला अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेची पहिली वहिली ट्रॉफी जिंकून दिली होती. श्रीलंकेला पराभूत करत भारतीय संघाने ही स्पर्धा गाजवली होती.

5 / 9

रनमशिन आणि किंग कोहली या नावाने क्रिकेट जगतात अधिराज्य गाजवणारा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये भारतीय संघाला U19 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरी ट्रॉफी जिंकून दिली होती.

6 / 9

उन्मुक्त चंद याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत तिसरे जेतेपद पटकावले होते.

7 / 9

अंडर १९ वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारांच्या यादीत पृथ्वी शॉचाही समावेश आहे. २०१८ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला शह देत चौथ्यांदा अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती.

8 / 9

यश धुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०२२ मध्ये इंग्लंडला पराभूत करत पाचव्यांदा अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते.

9 / 9

२०२६ च्या हंगामात आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडला १०० धावांनी पराभूत करत सहाव्यांदा अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली आहे.

टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलभारत विरुद्ध इंग्लंडआयुष म्हात्रेविराट कोहलीपृथ्वी शॉ