कुणीतरी येणार गं! ग्लेन मॅक्सवेल होणार बाबा; भारतीय संस्कृतीप्रमाणे विनीच्या डोहाळ जेवणाचा थाट

vini raman and maxwell love story : मॅक्सवेलची पत्नी विनी रमन ही भारतीय वंशाची असून तिने बेबी शॉवर समारंभाची एक झलक शेअर केली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल लवकरच बाबा होणार आहे. मॅक्सवेलची पत्नी विनी रमन ही भारतीय वंशाची असून तिने बेबी शॉवर समारंभाची एक झलक शेअर केली आहे.

भारतीय संस्कृतीप्रमाणे मॅक्सवेलच्या पत्नीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला. १८ मार्च २०२२ रोजी हे जोडपं विवाहबंधनात अडकले.

२०१३ मध्ये मेलबर्न स्टार इव्हेंटमध्ये ग्लेन व विनी यांची पहिली भेट झाली. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२०मध्ये भारतीय पद्धतीनेच दोघांनी साखरपुडा केला.

अँचोरमॅन 2@ क्राऊन येथे त्यांची पहिली डेट झाली. ग्लेन मॅक्सवेलने विनीला पहिल्यांदा तिथे I Love you म्हटले होते.

खरं तर भारतीय वंशाची विनी ऑस्ट्रेलियन नागरिक आहे.

विनीने ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथील Mentone Girls Secondary College मध्ये तिने वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले.

ग्लेन मॅक्सवेल आणि त्याची पत्नी विनी रमण यांच्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

२०१३ मध्ये मेलबर्न स्टार इव्हेंटमध्ये ग्लेन व विनी यांची पहिली भेट झाली. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२० मध्ये भारतीय पद्धतीनेच दोघांनी साखरपुडा केला होता.

मॅक्सवेल व विनी यांच्या लग्नाच्या पार्टीत RCBच्या खेळाडूंनी खूप धम्माल मस्ती केली. विराट कोहली बिनधास्त नाचताना दिसला होता.